बेलगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने माझी शाळा, सुंदर शाळा’ या स्पर्धेत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविला.

कर्जत (प्रतिनिधी) :- बेलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या स्पर्धेत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविला.
शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी गावातील ग्रामस्थ, शिक्षक गेली अनेक वर्षे प्रयत्नशील आहेत. डिजिटल शाळा, वाचनालय, क्रीडांगण, गुणवत्ता, परसबाग, बगीचा, खेळणींनी समृद्ध आहे. शाळेत ‘सीएसआर’ फंडातून
विविध सुविधांनीयुक्त सभागृह निर्माण करण्यात आले आहे. विद्यार्थी गुणवत्ता; तसेच विद्यार्थ्यांचा प्रत्येक उपक्रमात कृतियुक्त सहभाग असतो. विद्यार्थ्यांनी केंद्र व तालुकापातळीवर विविध स्पर्धात उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे.
शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, आनंदी बाजार, बालआनंद मेळावा, असे अनेक उपक्रम राबविले जातात. बेलगाव ग्रामस्थ, ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, पालक यांच्या सहकार्याने एक तालुक्यातील
आदर्श शैक्षणिक संकुल येथे उभारले गेले आहे. मुख्याध्यापक प्रफुल्ल खंडागळे, सुदाम बनाते, अनिलकुमार घोडके, रत्नमाला देशमुख, संदीप गोरे, वैशाली बोरुडे, दत्तात्रय एकशिंगे, शंकर भोईटे आदी शाळेत विविध उपक्रम राबवितात. गटशिक्षणाधिकारी उज्ज्वला गायकवाड, बीटचे विस्तार अधिकारी देवराम लगड, दशरथ धादवड, विश्वनाथ चौधरी, केंद्रप्रमुख प्रशांत त्र्यंबके, विष्णू गायकवाड, रघुनाथ लबडे, सर्व अधिकाऱ्यांचे शाळेला मार्गदर्शन मिळते.