आ.रोहित पवार यांच्या समर्थनात एमआयडीसीला मंजुरी मिळण्याबाबतच्या माही जळगावच्या रस्ता रोको आंदोलनात शुभम खोसे यांचे लक्षवेधी तुफानी भाषण.

राशीन( प्रतिनिधी )जावेद काझी. :- माननीय कर्तव्यदक्ष आमदार रोहित पवार यांच्या पाटेगाव खंडाळा येथील एमआयडीसीच्या मागणीला मंजुरी मिळण्याबाबत माहिजळगाव येथे शुक्रवार दि. २८/७/२०२३ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत नगर सोलापूर रस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शुभम खोसे यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको व धरणे आंदोलन करण्यात आले. या रस्ता रोकोत खाेसे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करीत युवकांच्या बेरोजगारीच्या इतर मूलभूत प्रश्नांवर सरकारला धारेवर धरले. त्यांच्या या मुलुख मैदानी तोफ उत्कृष्ट भाषणामुळे येत्या भावी काळात शुभम खाेसे पाटील यांच्याकडे तालुक्यातील युवा नेतृत्व म्हणून सध्या पाहिले जात आहे. या रस्ता रोको आंदोलना वेळी दादासाहेब वाळुंजकर, सावन शेटे, रामराजे खेडकर या दिग्गज नेत्यांचे भाषणे झाली. शेवटी तहसीलदार यांना एमआयडीसी होण्याबाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.