राशीन मध्ये संभाजी भिडेंच्या प्रतिमेचे दहन बेताल वक्तव्याबाबत राशीन पोलिसात कारवाईबाबत निवेदन.

राशीन(प्रतिनिधी) जावेद काझी. :- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले, महात्मा गांधी, पंडित नेहरू, राजाराम मोहन राय या महापुरुषाबद्दल मनोहर भिडेनी गरळ ओकली आहे. हा प्रकार अतिशय निंदनीय व चीड आणणारा असून सर्वत्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. याचा तीव्र शब्दात जाहीर निषेध करीत राशिन येथे महात्मा ज्योतिबा फुले चौकात भिडेच्या प्रतिमेस जोडे मारून प्रतिमेचे दहन करण्यात आले. डोक्यावर परिणाम झालेली व्यक्तीच अशी हरकत करू शकते. त्यामुळे मनोविकृत मनोहर उर्फ संभाजी भिडेस सरकारने तात्काळ येरवडा तुरुंगात डांबावे.
या मागणींचे निवेदन आज राशीन पोलिस स्टेशन ला देण्यात आले व सर्व फुले प्रेमी यांच्या वतीने निषेध व्यक्त केला. यावेळी राशीन महात्मा फुले चौकामध्ये संभाजी भिडेंच्या प्रतिमेचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला .यावेळी महात्मा ज्योतिबा फुले संघटना राशीन तसेच सर्व राजकीय, सामाजिक पक्षांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.