संभाजी भिडेंच्या बेताल वक्तव्याबाबत कर्जत पोलिसात कारवाईचे निवेदन.

राशीन( प्रतिनिधी) जावेद काझी. :- वारंवार नेहमीच वादाच्या भवऱ्यात चर्चेत असलेली शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मनोहर उर्फ संभाजी भिडे कुलकर्णी यांनी समस्त बहुजनांचे प्रेरणास्थान असणाऱ्या क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले ,राष्ट्रपिता महात्मा गांधी, नेहरू अशा अनेक समाजसुधारकांविषयी अमरावती येथे अपशब्द वापरून या महापुरुषांचा अपमान केला आहे
महापुरुष हे सर्वच समुदायाचे प्रेरणास्थान असतात, त्यांच्या विचारांवर देश पुढे जात असतो. परंतु संभाजी भिडे यांनी बेताल वक्तव्य करून याच महापुरुषाविषयी चुकीचे उदगार काढून समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या बेताल वक्तव्याचा निषेध करीत कर्जत मध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद अध्यक्ष सौ .मनीषा सोनमाळी, कर्जत तालुका अध्यक्ष सुमित राऊत, श्रीकांत यादव, व इतर पक्ष व विविध संघटनांच्या वतीने कर्जत पोलीस स्टेशनला संभाजी भिडे यांच्यावर कठोर कारवाई बाबत निवेदन देण्यात आले आहे.