राशीनमध्ये मोहरम सण मोठ्या उत्साहात साजरा.

राशीन( प्रतिनिधी) जावेद काझी. :- राशीन येथे परीटवाडी रोडवर राजबागसवार दर्गाह येथे मोहरम सण मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. दि. २४/७/२०२३. रोजी वरील ठिकाणी मंडप व विद्युत रोषणाईची आतषबाजी करीत ८ सावारिया बसविण्यात आल्या. दर दिवशी विधी मार्ग पूर्ण करीत ९ वी दिवशी कत्तल की रात रात्री नऊ ते दहा या दरम्यान ढोल ताशाच्या गजरात बहुसंख्य नागरीकांनच्या उपस्थितीत पार पाडण्यात आला.
तसेच शनिवार दि. २९/७/२३ रोजी दुपारी चार वाजता शेवटचा विधी मार्ग पार पाडीत ढोल ताशाच्या तालावर सवारी समोर दुहला खेळत अनेक भाविक भक्तांनी मोहरम चा आनंद लुटला यावेळी ताजुद्दीन काझी, अरुण काशीद, संतोष गवळी, फिरोज तांबोळी, सलीम शेख, हसन शेख, राजू तांबोळी, छगन पठाण यांचा सत्कार करण्यात आला. शेवटी राजबागसवार दर्ग्याचे खादीम ताजाेद्दीन काझी यांनी मोहरम कार्यक्रमासाठी आलेल्या महिला, पुरुष व इतर उपस्थित नागरिकांचे आभार मानले.