रस्त्यावर गतिरोधक बसवा अन्यथा मुलांना शाळेत पाटवणार नाही पालकांचा सा. बाधकाम विभागास इशारा

राशीन (प्रतिनिधी )जावेद काझी. :- कर्जत तालुक्यातील राशीन नजीक राजे भोसले वस्तीवर बारामती अमरापुर राज्य मार्गालगत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वअंगणवाडी आहे.
रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक जलद गतीने होत असल्यामुळे शाळा व अंगणवाडीतील लहान मुलांना रस्ता ओलांडून शाळेत येणे जाने धोक्याचे झाले असून मुलांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या शाळेत जवळपास 28 मुले तर अंगणवाडीत 15 मुले आहेत पालकांच्या मते अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी वाघमारे यांना निवेदनद्वारे आंदोलनाचा इशारा देऊन देखील अद्याप जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजे भोसले वस्ती वरील बारामती अमरापुर रस्त्यावर गतिरोधक बसवण्यात आलेले नाही गेल्या वर्षी याच जागेवर रामदास श्रीरंग सपाटे यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. मृत्यूनंतर आमदार रोहित पवार व राम शिंदे दोघांनी गौतम रामदास सपाटे यांच्या कुटुंबास सांत्वन भेट देत या ठिकाणी गतिरोधक बसवण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देऊन चर्चा देखील केली होती.
त्यानंतर परत वेळोवेळी पाठपुरावा करून देखील शाळेजवळ फक्त पांढरे पट्टे मारलेले आहेत अद्याप गतिरोधक झालेला नाही. वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा करून देखील गतिरोधक न बसल्यामुळे शाळेतील मुलांच्या पालकांनी भीतीपोटी मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतलेला असून आठ दिवसात शाळेजवळील गतीरोधक बसावेत अन्यथा होणाऱ्या घटनेला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील असे मत गौतम श्रीरंग सपाटे व इतर मुलांच्या पालकांनी व्यक्त केले आहे.