राशीन येथील हसू अडवाणी विद्यालयास माजी विद्यार्थी शेखर जाधव यांच्याकडून वृक्षांरोपवाटीकांची भेट.

राशीन( प्रतिनिधी) जावेद काझी. :- हसू अडवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक राशीन येथील विद्यालयातील माजी विद्यार्थी श्री शेखर राजेंद्र जाधव यांच्याकडून विद्यालयाची शोभा वाढेल या दीर्घ दृष्टीने विविध प्रकारची वृक्षरोपे भेट देण्यात आली. या कौतुकास्पद संकल्पनेबद्दल समाज विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. अल्लाउद्दीन काझी तसेच हाशु अडवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक
( कला ,वाणिज्य, विज्ञान, ) विद्यालयाचे प्राचार्य श्री राजेंद्र नष्टे सर यांच्या हस्ते शेखर जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जाधव यांचे पितामय मायेचे छत्र लहान वयातच हरपल्यामुळे शेखर जाधव यांचा संघर्षमय असणारा जीवन प्रवास व आज ते ज्या सेवाभावी वृत्तीने समाजातील वृद्ध ,अपंग ,गरीब, गरजू, व इतर सर्वसामान्य नागरिकांची मदत करतात याविषयी माहिती विद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात आली. आईसाहेब ॲम्बुलन्सच्या माध्यमातून राशीन व परिसरातील दहा किलोमीटर परिसरातील गरोदर महिलेस मोफत दवाखान्यात पोहोच करणे, त्याचबरोबर अनाथ गरीब लोकांना देखील मोफत ऍम्ब्युलन्स सेवा देण्याचे काम या जिगरबाज शेखर कडून वारंवार होत आहे. प्राध्यापक मुस्ताक शेख यांच्या प्रयत्नातून या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यालयातील शिक्षक, कर्मचारी वृंद आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.