pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

सोनमाळी कन्या विद्यामंदिरचे सलग तिसन्या वर्षी तालुक्यात सर्वाधिक शिष्यवृत्ती धारक

रयत शिक्षण संस्थेच्या, सौ. सोनाबाई नामदेवराव सोनमाळी कन्या विद्या मंदिरच्या शिष्यवृत्ती धारक विद्यार्थिनी

Samrudhakarjat
4 6 6 1 8 7

कर्जत (प्रतिनिधी) :- नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षांच्या निकालात येथील रयत शिक्षण संस्थेच्या, सौ. सोनाबाई नामदेवराव सोनमाळी कन्या विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यशाची परंपरा कायम ठेवली आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी आणि आठवी मध्ये तालुक्यात सर्वाधिक १० विद्यार्थिनी कन्या विद्यामंदिरच्या शिष्यवृत्ती धारक झाल्या आहेत. मागील सलग तीन वर्ष्यापासून तालुक्यात सर्वाधिक विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक होण्याचा मान विद्यालयाने मिळविला आहे.

विशेष बाब म्हणजे विद्यामंदिरची विद्यार्थिनी श्रेया जाधव हिने ३०० पैकी २७० गुण मिळवत राज्य गुणवत्ता यादीत ८ वा क्रमांक तर जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. शिष्यवृत्ती परीक्षेच्या यशात विद्यालयाचे सातत्य सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी पुढीलप्रमाणे:इयत्ता ५ वी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी: श्रेया जाधव, ज्ञानेश्वरी भुजबळ, समृद्धी गरड, माहेश्वरी शिंदे, अनुष्का झिंजे, अनुष्का शेळके, मधुरा शेळके. इयत्ता ८ वी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी:

स्नेहा कोपनर, तेजस्विनी लोखंडे, श्रेया भोसले, विद्यालयाच्या या यशस्वी कामगिरीबद्दल सर्व शिष्यवृत्ती धारक विद्यार्थिनी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे आमदार रोहित पवार, जनरल बॉडी सदस्य राजेंद्र फाळके, जनरल बॉडी सदस्य अंबादास पिसाळ, स्थानिक स्कूल

श्रेया जाधव

कमिटी सदस्य सुवर्णा सोनमाळी, स्वाती पाटील, शबनम इनामदार, विभागीय अधिकारी तुकाराम कन्हेरकर, शिवाजी तापकीर, काकासाहेब वालुंजकर व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका इर्शाद पठाण, प्रभारी मुख्याध्यापक सुरेश भोयटे यांनी विशेष अभिनंदन केले.

“स्पर्धा परीक्षांची नियोजनबद्ध तयारी आणि भरपूर सराव या जोरावरच वर्षभरातील सर्वच शासकीय स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यालयाने नेत्रदीपक यश संपादन केले आहे. “- सुरेश भोयटे (प्र.मुख्याध्यापक)
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker