नवनवीन कलात्मक मनोरंजन कार्यक्रम घेत विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ हशु आडवाणी मध्ये संपन्न….!

राशीन( प्रतिनिधी )जावेद काझी. :- दि.१५/०७/२०२३ नवीन शैक्षणिक वर्षांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ हशु आडवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राशीन मध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष समाज विकास संस्थेचे, संस्थापक अध्यक्ष मा.अल्लाउद्दीन काझी साहेब होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोटा मेंटॉर्स शैक्षणिक संकुल कर्जतचे संस्थापक अध्यक्ष श्री.केशवजी आजबे सर होते.त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना उचित दिशेने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.तसेच समाजात असताना ज्या वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्याला ज्ञान मिळत असते ते ज्ञान घेत राहवे व आपली वाटचाल करत रहावे असे सांगितले. शेवटी “विद्यार्थ्यांचा यशाचा शिल्पकार विद्यार्थीच स्वतः असतो ” हे त्यांनी आवर्जून सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.विठ्ठल काळे यांनी केले. कार्यक्रमाची अध्यक्ष निवड कु.विद्या काळे हिने केली तर अनुमोदन कु.प्रेरणा आरडे हिने दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.कोमल गवळी व कु.प्रतिक्षा काळे यांनी केले.यावेळी श्रीमती.ललिता कांबळे मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार कु.प्रेरणा आरडे, कु. श्रुतिका कानगुडे, कु.प्रज्ञा काळे, कु.विद्या काळे, कु. प्रतीक्षा काळे, कु.सानिया शेख, कु.क्षितिजा भांडवलकर या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले.
मार्गदर्शन कार्यक्रमानंतर दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांसाठी “फ्रेशर पार्टी”चे आयोजन करण्यात आले होते यात विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले.या कार्यक्रमासाठी पत्रकार मा.जावेद काझी, मा.श्री. पानसरे , मा.जाकिरभाई काझी, मा.मोहसीन भैय्या काझी,मा.शोएब काका काझी, मा.साहील दादा काझी यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. “फिश पाँट कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सागर नष्टे ,प्रा.आजबे सर यांनी केले.
कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांनी वेगवेगळे कलागुण सादर केले व उपस्थित त्यांची मने जिंकली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.अक्षरा कांबळे व निकेश कांबळे यांनी केले.
मान्यवरांच्या स्वागतासाठी आकर्षक अशी रांगोळी कु.क्षिताजा भांडवलकर, कु.प्रज्ञा काळे,कु.संस्कृती पुदाले,कु.माधुरी शेटे,कु.अश्विनी कानगुडे विद्यार्थिनींनी रेखाटली होती.त्याचे सर्वच उपस्थितांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य आदरणीय श्री.राजेंद्र नष्टे सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.संकेत आजबे व प्रा. दिगांबर साळवे यांनी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांच्या विशेष सहकार्याने केले.