राशीन येथील हशु आडवाणी ज्ञान मंदिरावर जबरी दरोडा दीड लाखाचे नुकसान पोलिसात तक्रार दाखल.

राशीन ( प्रतिनिधी) जावेद काझी. :- राशीन येथील हशु आडवाणी विद्यालयात रात्री १२”३० ते २ च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी जबर दरोडा घालीत चोरी केली यामध्ये विद्यालयातील पहिल्या मजल्यावर ग्रंथालयाची पुस्तके, खेळाडू विद्यार्थ्यांचे ड्रेस, जाळण्यात आले आहेत.
तसेच लाईट, विद्यालयाच्या वर्गातील डिजिटल बोर्डची तोडफोड करून मोठे नुकसान केले आहे. तसेच बाहेरील मुतारीच्या भिंतीचे तोडफोड करून एकूण ३ डिजिटल बोर्ड, विद्यार्थ्यांचे कपडे,पुस्तके, मुतारीची पडलेली भिंत,एकूण दीड लाख रुपये विद्यालयाचे नुकसान झाले
अशी माहिती विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष अल्लाउद्दीन काझी यांनी दिली आहे.
सदर घटनेची तक्रार राशिन पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली असून. पुढील तपास पोलिसांमार्फत जोमाने चालू असून लवकरच ज्ञान मंदिरात दरोडा घालणारे अज्ञातआरोपी गजाआड दिसेल असा विश्वास पोलिसांकडून मिळत आहे. अशा शैक्षणिक ज्ञान मंदिरात शालेय वस्तूंची नासधुस करणं हे माणुसकीला काळिंबा फासणारी असून योग्य नाही.
अशी निंदनीय घटना हशु आडवाणी विद्यालयाच्या 22 वर्षाच्या कार्यकाळात प्रथमच घडली असल्याचे संस्थापक अध्यक्ष अल्लाउद्दीन काझी, विद्यालयाचे प्राचार्य, राजेंद्र नस्टे, यावेळी बोलून दाखवले.
अशा विकृत समाजकंटकांचा त्वरित शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी शालेय कमिटी,प्राचार्य ,शिक्षक व कर्मचारी, विद्यालयातील विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांच्याकडून होत आहे.