राशिन मध्ये जागर समाज परिवर्तनाचा नवरात्र विशेषांक प्रकाशन सोहळा श्री जगदंबा देवी मंदिरात मोठ्या उत्साहात संपन्न.

राशीन (प्रतिनिधी)जावेद काझी.:- परिवर्तनाच्या वाटचालीत आणखी एक मानाचा शिरपेच जागर समाज परिवर्तनाचा नवरात्र विशेषांक २०२३ वर्ष सातवे.
प्रकाशन सोहळा आज प्रमुख मान्यवर उपस्थिताच्य हस्ते जगदंबा देवी मंदिरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी.
मा.श्री. बळप साहेब ( पोलीस निरीक्षक, कर्जत)तसेच मा. श्री. शंकर ( दादा ) देशमुख ( विश्वस्त, श्री जगदंबा मंदिर पब्लिक ट्रस्ट राशीन ), मा. श्री. शिवदास आप्पा शेटे ( माजी. सरपंच ग्रा. पंचायत राशीन ), मा. श्री. ज्ञानदेव काळे सोबत जागरचे संपादक व प्रकाशक मा. श्री. किशोर जाधव व मित्रपरिवार. इतर ग्रामस्थ, व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते
.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी,जागरच्या पुढील वाटचालीस यावेळी सर्वांनी सस्नेह शुभेच्छा दिल्या.
.शेवटी जागर चे संपादक किशोर शिवाजी जाधव यांनी याप्रसंगी उपस्थितांचे मनापासून आभार मानले.