राशिन ग्रामपंचायत विरोधात कमलेश साळवे यांचे विविध मागण्यासंदर्भात आमरण उपोषणाचा दुसरा दिवस.

राशीन (प्रतिनिधी)जावेद काझी. :- पीपल्स रिपब्लिकन पार्टी कर्जत तालुका युवक अध्यक्ष कमलेश साळवे यांनी राशीन ग्रामपंचायत समोर विविध मागण्या संदर्भात सोमवार दिनांक ९/१०/२३ रोजी सकाळी दहा वाजल्यापासून आमरन उपोषण सुरू केले असून आज उपोषण चा दुसरा दिवस आहे.
उपोषणाच्या प्रमुख मागण्या
दलित वस्ती विशेषता आंबेडकर नगर, अण्णाभाऊ साठे नगर या दोन्ही वसाहती मधील मंजूर असलेले शौचालयाचे त्वरित सुरू करण्यात यावे, तसेच बांधकामास दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. राशीन गावामध्ये प्रामुख्याने बाहेरगावाहुन येणाऱ्या प्रवासी महिला आठवडे बाजार साठी येणाऱ्या महिलांसाठी स्वच्छतागृह बांधण्यात यावे. श्री जगदंबा विद्यालया समोर मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित गतिरोधक बनवावा. या विविध मागण्या संदर्भात कमलेश साळवे यांचे उपोषण चालू असून आज उपोषणाचा दुसरा आहे. यासंदर्भात राशीन ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी कापरे यांच्याशी फोन द्वारे चर्चा केली असता अण्णाभाऊ साठे नगर वस्तीमध्ये दोन शौचालय मंजूर असून एका शौचालयाचे काम चालू असून दुसरे शौचालयाचे जागे अभावी प्रलंबित आहे, तर दलित वस्ती विशेषता आंबेडकर नगर मधील शौचालयाचे कामदेखील जागे अभावी प्रलंबित असल्याचे ग्रामविकास अधिकारी कापरे यांनी सांगितले. तर संपूर्ण मागण्या मान्य होईपर्यंत उपोषणास ठाम असल्याचे कमलेश साळवे यांनी सांगितले.