
कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रसाद ढोकरीकर व राजेंद्र पवार यांची निवड जाहीर झाली. स्वीकृत नगरसेवक पदासाठी पिठासिन अधिकारी पाटील यांनी राबविलेल्या निवड प्रक्रियेत २ जागांसाठी ४ व्यक्तींनी अर्ज दाखल केले. पक्षनिहाय तौलनीक संख्याबळाच्या आधारावर राष्ट्रवादी व काँग्रेसच्या आघाडीकडे १.७६ मत होते. भाजपाकडे ०.२४ मते होती. दोन जागांसाठी राष्ट्रवादी व काँग्रेसने प्रसाद ढोकरीकर व राजेंद्र पवार यांचे अर्ज दाखल केले. मात्र अमोल भगत व माजीद पठाण यांनीही त्याच गटातून अर्ज दाखल केले. त्यामुळे नियमानुसार गटनेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचे पिठासिन अधिकारी यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादीचे उमेदवार राजेंद्र पवार यांच्या अर्जावर वकिलामार्फत आक्षेप नोंदवला. त्यानंतर पिठासिन अधिकाऱ्यांनी प्रसाद ढोकरीकर व राजेंद्र पवार यांची निवड जाहीर केली.
निवडीनंतर गुलालाची उधळण करत व फटाक्याची आतषबाजी करत नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मिरवणूक काढत ग्रामदैवत श्री गोदड महाराज मंदिरात जावून सर्वांनी दर्शन घेतले. तेथील सभेत अनेकांची भाषणे झाली. आ. रोहित पवार यांनी निवडणूक काळात सर्व जातीधर्माच्या व्यक्तींना सत्तेत प्रतिनिधित्व देण्याचा शब्द पाळल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
यावेळी प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत, शहराध्यक्ष सुनील शेलार, पाणीपुरवठा सभापती भाऊसाहेब तोरडमल, गटनेते संतोष म्हेत्रे, उपगटनेते सतीश पाटील, नगराध्यक्षा उषा राऊत, नगरसेवक भास्कर भैलुमे, नगरसेविका ज्योती शेळके, नगरसेविका प्रतिभा भैलुमे व आदींनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन युवक अध्यक्ष विशाल म्हेत्रे यांनी केले. सभापती भाऊसाहेब तोरडमल यांनी आभार मानले. याप्रसंगी नगरसेवक अमृत काळदाते, नगरसेविका ताराबाई कुलथे, नगरसेविका लंकाताई खरात, नगरसेविका सुवर्णा सुपेकर, नगरसेविका छाया शेलार, सचिन कुलथे, देविदास खरात, लालासाहेब शेळके, रवींद्र सुपेकर, अजय भैलुमे, आदी उपस्थित होते.
– प्रसाद ढोकरीकर नवनिर्वाचित, नगरसेवक