सर्व सामाजिक संघटनेचे वृक्षतोड विरोधात मुक आंदोलन

कर्जत (प्रतिनिधी) : – कर्जत शहरातील महावितरण कार्यालयच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर विनापरवाना वृक्षतोड करण्यात आलेली होती.काही झाडांच्या फांद्या कटरच्या सहाय्याने कापून काढण्यात आलेल्या आहेत. यामध्ये लिंब व इतर झाडांचा समावेश आहे.विजेच्या तारांना अडथळा ठरत असल्याने ही झाडे तोडण्यात आले आहेत असे सांगण्यात आले . मात्र यासाठी महावितरणच्या वतीने रीतसर परवानगी घेतली नसल्याचे समोर आले. कर्जत नगरपंचायत हद्दीत ही वृक्षतोड करण्यात आलेली आहे.
नगरपंचायतच्या वतीने माझी वसुंधरा अभियान राबविले जात आहे. त्यातून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड व रोपांचे संगोपन करण्यात येत आहे. यामध्ये सर्व सामाजिक संघटनेच्या शिलेदारांचे मोठे योगदान आहे. मात्र कर्जत शहरातच विनापरवाना वृक्षतोड झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने महावितरण कार्यालय समोर मुक आंदोलन करून जाब विचारण्यात आला त्यावेळी प्रभारी उपविभागीय अधिकारी सतेंद्र सिंग यांनी सर्व सामाजिक संघटनेचे माफी मागितली व जी वृक्षतोड झालेली आहे त्याच्या दुप्पट वृक्षलागवड करुन देण्याचा शब्द दिला आहे. यावेळी सर्व सामाजिक संघटनेचे शिलेदार नितीन देशमुख यांनी बोलताना सांगितले नगरपंचायतीच्या परवानगीशिवाय वृक्षतोड होऊ नये त्याचबरोबर नागरिकांनीही परवानगी घेतल्याशिवाय वृक्ष तोड करू नये केल्यास नगरपंचायतीने वृक्षतोड करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी तसेच नागरीकांनी वृक्षलागवड वर भर दिला तर कर्जत शहर लवकरच हारीत कर्जत म्हणून ओळखले जाईल असे आवाहन सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आले. यावेळी सर्व सामाजिक संघटनेचे शिलेदार तसेच कर्जत नगरपंचायतचे अधिकारी कर्मचारी, उपनगराध्यक्ष,नगरसेवक, विविध राजकीय पक्षांचे अध्यक्ष, वृक्षप्रेमी नागरिक उपस्थित होते.