वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाने आदिवासींना न्यायएड: डॉ.अरुण जाधव .

राशीन( प्रतिनिधी) जावेद काझी :- वार शुक्रवार दि.१८/०८/२०२३
१)मौजे निमगाव डाकू येथील गट नंबर १३१/२ या जमिनीमधील २००० ते २५०० ट्रॅक्टर ट्रॉली मुरूम जमीनीच्या मालकाला न विचारता व कोणतीही कल्पना न देता या शेतातील मुरूम गावातील व शेजारी राहणाऱ्या लोकांनी उचलून नेला, याची चौकशी होण्यात यावी यासाठी.
२)मौजे निमगाव डाकू येथील गट नंबर १४९/१/ब या जमिनीची गेल्या ८ महिने झाले. खरेदी झालेली आहे. दस्तावेज झालेले आहे, परंतु ही जमीन शेत मालकाच्या ताब्यात नाही. ही जमीन शेतमालकाला विभाजन करून द्यावे यासाठी.
३)मौजे देशमुख वाडी येथील गट नंबर ४२६ मधून कुकडी कॅनल गेलेला आहे. परंतु सदर संपदांची रक्कम गेल्या ४ वर्षापासून या शेतमालकाला त्याची जमीन कुकडी कॅनल मध्ये गेलेली आहे. तरीही त्याचा मोबदला मिळालेला नाही. वारंवार कुकडी विभाग, भूसंपादन विभाग व भूमी अभिलेख यांना पाठपुरावा करूनही त्याचा मोबदला मिळाला नाही. यासाठी.
४)मौजे निमगाव डाकू व पाटेवाडी शिव रस्ता सर्वे नंबरच्या बांधावरून न जाता गट नंबर १५४ व १५६ मधून शेतमालकाला कोणतेही नोटीस न देता त्यांना न विचारताघेत या सर्वे नंबर बांधावरून न जाता फक्त या शेतकऱ्याच्याच शेत जमिनीतून शिव रस्ता नेण्यात आला यासाठी.
या ४ विषयाला घेऊन एड. डॉ. अरुण (आबा) जाधव राज्य समन्वयक वंचित बहुजन आघाडी यांच्या नेतृत्वाखाली व सोमनाथ भैलुमे (मा. तालुकाध्यक्ष) वंचित बहुजन आघाडी यांच्या मार्गदर्शनाखाली हे आमरण उपोषण करण्यात आले. ही आमरण उपोषण कर्जत तहसील च्या समोर करण्यात आले.या उपोषणासाठी विविध संघटना पक्षांनी पाठिंबा दिला.मा. प्रथम नगराध्यक्ष नामदेव देवा राऊत नंदकुमार गाडे , पारधी विकास कृती समिती जिल्हा समन्वयक तुकाराम पवार
, दिसेना पवार, रंगीशा काळे, राहुल पवार, कायदेशीर पवार, संजय भैलुमे RPI तालुकाध्यक्ष, रोहन कदम, गोदड समुद्र, संतोष आखाडे, विजय साळवे, नागेश घोडके, अनिल समुद्र, चंद्रकांत डोलारे, महेश आखाडे, जयराम काळे, सचिन काळे, शितल काळे, फरीदा शेख व शुभांगी गोहेर यांनी जाहीर पाठिंबा दिला.
उपोषण कर्ते -मात्री काळे, विजया काळे, सुनीता काळे आशा काळे, कौसाबाई काळे, राजू काळे व उज्वला काळे.