राज्यात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या नगरपंचायतला मुख्याधिकारी व कर्मचारी द्या : छाया शेलार

कर्जत प्रतिनिधी: माझी वसुंधरा मध्ये राज्यस्तरीय अनुक्रमे द्वितीय आणि प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या कर्जत नगरपंचायत ला जवळपास दहा महिन्यांपासून कायम स्वरूपी मुख्याधिकारी मिळाले नाही. ही कीती खेदजनक बाब आहे. याबाबत कर्जत नगरपंचायत च्या नगरसेविका सौ छाया शेलार यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाव्दारे मागणी केली आहे. की कर्जत नगरपंचायत मध्ये साधारण दहा महिन्यांपासून कायम स्वरूपी मुख्याधिकारी नाहीत. तसेच सिव्हिल इंजिनिअर, पाणीपुरवठा इंजिनिअर, लेखापाल, लेखापरिक्षक, गट क श्रेणी व नगररचना सहाय्यक ( इंजिनिअर), करनिरिक्षक, सह करनिरिक्षक नाहीत. तसेच नगर पंचायत मधील काही रिक्त पदे सुध्दा प्रभारी (प्रतिनियुक्ती वरती आहेत) तरी वरील सर्व पदावरील अधिकारी यांची कर्जत नगरपंचायतमध्ये कायम स्वरुपी नियुक्ती होणे गरजेचे असल्याचे शेलार यांनी निवेदनात म्हटले आहे वरील सर्व नियृक्त्या रिक्त असल्या कारणाने सर्व
प्रभागातील विकास कामे प्रलंबीत आहेत. यात प्रामुख्याने कामाचे इस्टीमेट वेळेवर न होणे, बीले अदा न होणे तसेच पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, वैयक्तिक शौचालय प्रकरणे, बांधकाम परवाना,नवीन जागेच्या नोंदी, पाणी पुरवठा
योजना, विद्युत विभाग व नगरसेवकांच्या प्रभागातील कामे तसेच विविध विषयांची अनेक कामे होत नसल्यामुळे नगरपंचायत बाबतीत जनतेत कमालीचा रोष वाढत चाललेला आहे. तसेच नगरपंचायत समोर अनेक कामांच्या बाबतीत धरणे आंदोलन, उपोषणे केली जात आहेत. तरी या बाबतीत नगरविकास विभागाला व जिल्हाधिकारी कार्यालयास या अगोदर बऱ्याचवेळा पत्रव्यवहार करून सुद्धा कायमस्वरूपी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होत नाहीत असे निवेदनात म्हटले आहे. तसेच इतर रिक्त पदावर सुद्धा नियुक्त्या झाल्या नाहीत. त्यामुळे कर्जत नगरपंचायत चे सर्व पदाधिकारी ०१/०९/२०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
अमरण उपोषणास बसणार आहोत. असा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून शेलार यांनी दिला आहे. या निवेदनावर नगराध्यक्षा उषा अक्षय राऊत, उपनगराध्यक्षा रोहिणी सचिन घुले, नगरसेवक भाऊसाहेब सुधाकर तोरडमल, संतोष सोपानराव मेहेत्रे, सतीष उध्दवराव तोरडमल, भास्कर बाबासाहेब भैलुमे,नामदेव चंद्रकांत राऊत,अमृत श्रीधर काळदाते नगरसेविका श्रीमती ताराबाई सुरेश कुलथे, मोनाली ओंकार तोटे, ज्योती लालासाहेब शेळके, लंकाबाई देविदास खरात, सुवर्णा रविंद्र सुपेकर,प्रतिभा नंदकिशोर भैलुमे, छाया सुनिल शेलार आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या निवेदनाच्या प्रती पोलिस अधीक्षक अहमदनगर, तहसीलदार कर्जत, पोलिस निरिक्षक कर्जत पोलिस स्टेशन यांना देण्यात आलेल्या आहेत.