Advertisement
ब्रेकिंग

कर्जत शहरातील कोटा मेंटॉर्स स्कूलमध्ये पालकांची आर्थिक लूट.

Samrudhakarjat
4 0 1 9 1 2

कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत शहरातील कोटा मेंटॉर्स स्कूलमध्ये पालकांची आर्थिक लूट होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. आरटीईमधून प्रवेश होऊनही पालकांना फीची मागणी केल्याची तक्रार किरण जगताप यांनी शिक्षण विभागाकडे दाखल केली आहे. तक्रारीत त्यांनी म्हटले आहे, माझा मुलगा 

कर्जत शहरातील कोटा मेंटॉर्स स्कूलमध्ये संस्कार किरण जगताप हा दुसऱ्या इयत्तेत शिकत आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) त्याचा प्रवेश झालेला आहे. या कायद्यान्वये या विद्यार्थ्यांची शिकवणी शुल्क ( Tuition fee) ही शासनाकडून भरली जाते. तरीही कोटा मेंटॉर्स स्कूलमध्ये या विद्यार्थ्यांच्या शिक्षण फीची सक्तीने मागितली जात आहे. शैक्षणिक शुल्काच्या वसुलीसाठी शाळेमधून तगादा लावला जात आहे. कोटा मेंटॉर्स शाळेमधून मला माझ्या ८८३०५२२२७५ या मोबाईल क्रमांकावर २४ ऑगस्ट २०२३ रोजी १२.१० वाजता ९५१८७२१०९१ या मोबाईल क्रमांकावरून कॉल आला. कॉलरवर अशोक आजबे असे नाव दाखवत असून त्यांनी मला तुमच्या दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची १३००० रुपये फी तात्काळ भरून टाका, असे सांगितले. त्यावर मी माझ्या मुलाचा आरटीईमधून प्रवेश झाला आहे, तरीही फी भरायची आहे का ? अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी एकूण १३००० एवढी फी असून त्यातील ७००० रुपये फी आता भरावी लागेल, असे सांगितले. त्याचे कॉल रेकॉर्ड माझ्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे या शाळेमधून फीच्या नावाखाली पालकांची नियमबाह्य पद्धतीने आर्थिक लूट केली जात असल्याची माझी तक्रार आहे. माझ्या मुलाला याच शाळेतून शालेय गणवेश तसेच पुस्तके यांची सक्तीने खरेदी करायला लावली. त्यानुसार मी माझ्या मुलासाठी गणवेश तसेच पुस्तके याच शाळेमधून खरेदी केली. या खरेदी वेळी मला शाळेकडून पावती देण्यात आलेली नाही. या शाळेमधून गणवेश पुस्तके याची पालकांना सक्तीने खरेदी करायला लावली जात असून या माध्यमातून पालकांची आर्थिक लूट केली जात आहे. कोणतेही शुल्क आकारल्यानंतर पालकांना विहित नमुन्यातील पावत्या या शाळेमधून दिल्या जात नाहीत. या सर्व प्रकाराची महाराष्ट्र शासनाचे विविध विभाग तसेच शिक्षण विभागाकडून संस्था, प्राचार्य व शालेय व्यवस्थापनाच्या कामकाजाची सखोल चौकशी व्हावी व संबंधितांवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी आहे. केलेल्या कारवाईचा अहवाल मला उपलब्ध करून देण्यात यावा. शिक्षण विभागाकडे शाळेतील गैरकारभाराविषयी तक्रार केल्यामुळे माझा पाल्य संस्कार किरण जगताप याला शाळेमधून सापत्न वागणूक व मानसिक त्रास मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबतही शिक्षण विभागाकडून शालेय प्रशासनास योग्य सूचना देण्यात याव्यात.

अशी मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे

     कर्जतचे गटशिक्षण अधिकारी देवराम लगड यांना विचारले असता त्यांनी वरील विषयाची माहिती घेऊन योग्य कारवाई केली जाईल असे सांगितले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker