Advertisement
ब्रेकिंग
Trending

कर्जत मध्ये जागतिक छायाचित्र दिन उत्साहात संपन्न.

Samrudhakarjat
4 0 1 8 4 8

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्यातील रेहेकुरी अभयारण्य या ठिकाणी केकेआर फोटोग्राफर युनियनच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

 यावेळी जेष्ठ छायाचित्रकार कै. किसनराव तोरडमल यांच्या समरणार्थ सर्व छायाचित्रकरांचा सन्मान व सत्कार स्मिता फोटो स्टुडिओचे संचालक राजेंद्र तोरडमल याच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमा वेळी प्रथम कॅमेरा पूजन उपस्थित सर्व फोटोग्राफ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर राज्यातील अपघात, तसेच आजारपण व वयोवृध्दा मुळे मृत्यू पावलेल्या छायाचित्रकरांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

   फ्रान्सने १९ ऑगष्ट १८३९ ला फोटोग्राफी या आविष्काराला मान्यता दिली. तेव्हापासून १९ ऑगस्ट हा दिवस जागतिक छायाचित्र दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच छायाचित्रणामधील आजपर्यंतच इतिहास केकेआर फोटोग्राफर युनियनचे अध्यक्ष सागर डाळिंबे यांनी प्रस्ताविकांमध्ये सांगितला.

      छायाचित्रकारासाठी मोबाईल स्पर्धक ठरत असल्याचे चित्र आहे. काही वर्षांपूर्वी कॅमेऱ्यातून टिपलेले छायाचित्र हातात पडण्यासाठी पंधरा दिवस वाट पाहावी लागत असे. काळ बदलला आणि छायाचित्रणाची माध्यमेही बदलली. रोलचा कॅमेरा, डिजिटल कॅमेरा ते मोबाइल असा हा प्रवास झाला.टिपलेले छायाचित्र काही सेकंदांत पाहता येऊ लागले तरी कलेतील आकर्षण कायम आहे. छायाचित्रण हा छंद किंवा व्यवसाय म्हणून जोपासला जात असला तरी त्यासाठी कलात्मक दृष्टी आवश्यक असते. जरी कालानुरूप फोटोग्राफीमध्ये बदल होत असला तरी फोटोग्राफरने आपले आर्थिक गणिते सांभाळून व्यावसायात गुंतवणूक करावी, तसेच आरोग्य आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्व फोटोग्राफरने एकत्रित येऊन काम करावे असे प्रतिपादन करत स्वतःचा फोटोग्राफी विषयीचा अनुभव सांगून मोलाचे मार्गदर्शन एबीपी माझा मराठी वृत्तवाहिनीचे अहमदनगर प्रतिनिधी सुनील भोंगळ यांनी केले. तसेच रेहकुरी अभ्यारण्याचे वनरक्षक अरुण साळवे यांनी अभयारण्य मध्ये आढळणाऱ्या प्राण्यांची माहिती दिली. वाइल्डलाइफ फोटोग्राफीसाठी चांगले ठिकाण असल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यशाळेचे मार्गदर्शक किरण कुंभार, महेंद्र मांडगे, सचिन पोटे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

  किरण कुंभार यांनी लाईट फोटोग्राफी या विषयी सोप्या भाषेत मार्गदर्शन करून फोटोग्राफी संदर्भात महत्वाची माहिती देऊन फोटोग्राफर मधील उत्साह वाढवण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.

    तसेच सर्व छायाचित्रकारांसाठी निसर्गाच्या सानिध्यात वन भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. कर्जत, करमाळा, राशीन,मिरजगाव, माहिजळगावसह परिसरातून मोठ्या संख्येने छायाचित्रकार या कार्यक्रमास उपस्थित होते. नितीन कोल्हे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker