कुकडीचे ओव्हर फ्लो पाणी बेलोरा व मकाई चारीला सोडा:सरपंच युवराज हाके.

कर्जत (प्रतिनिधी) :- सध्या कर्जत तालुक्यात कुकडीचे ओव्हर फ्लो पाणी चिलवडी चारीला जोमाने सुटलेले आहे. सध्या वरून राजा रुसलेला असून पावसाचे प्रमाण अतिशय कमी म्हणजे नाही च्या बरोबर आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे व जनावराच्या पिण्याच्या पाण्यासाठी सध्या भटकंती चालू झाली असून अशा दुष्काळी परिस्थितीत कुकडीच्या पाण्याची फार आवश्यकता निर्माण झाली असून ओव्हर फ्लो चे पाणी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा असून, देशमुख वाडी नाजूर तलाव, मकाई चारी, काळेवाडी पाझर तलाव, होलेवाडी, चिलवडी, काळेवाडी, परीट वाडी, करपडी पाझर तलाव, मानेवाडी, शिंपोरा , खैदान वाडी, आकाेणी तसेच नांदणी नदी, करमणवाडी, वायसेवाडी, तसेच कर्जत तालुक्यातील तर पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरून मिळावे तरच शेतकऱ्यांच्या शेतीचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकेल याबाबतचे निवेदनाद्वारे करपडीचे माजी सरपंच युवराज हाके, नितीन गोरख जगताप, दिलीप सोपान लोंढे यांनी मुख्य कार्यकारी अभियंता कुकडी डावा कालवा कोळवडी तालुका कर्जत यांना कुकडी ओव्हर फ्लाेह चे पाणी सदर गावातील तलावात व नदी मध्ये पाणी सोडण्याबाबत निवेदन युवराज हाके यांनी दिली आहे.