महालक्ष्मी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आय.सी.यु सेंटर मुळे सिरीयस पेशंटला मिळणार जीवदान – डॉ. राजेश तोरडमल.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी. :- अत्यंत खडतर कठीण परिश्रम जिद्दीने चिकाटीच्या बळावर डॉ.नितीन खरात , डॉ. युवराज शिंदे , डॉ कृष्णकांत गावंडे यांनी महालक्ष्मी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आय सी यु सेंटर उभारून राशीनसह परिसरातील पेशंट व नागरिकांसाठी जीवनदान देण्याचे काम केले आहे . तसेच राशीनच्या वैभवात भर घातली असे प्रतिपादन कर्जत तालुका डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश तोरडमल यांनी केले . ते राशीन येथे महालक्ष्मी हॉस्पिटल आय . सी . यु सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते .ते पुढे म्हणाले की , राशीन परिसरातील रुग्णांना अत्यावश्यक सुविधा मिळण्यासाठी भिगवण किंवा बारामतीला जावे लागत असे आत्ता राशीनमध्ये महालक्ष्मी हॉस्पिटलच्या रूपाने सुविधा मिळाल्याने नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान केले .
यावेळी डॉक्टर असोसिएशन चे राशीन शहराध्यक्ष डॉ. पंकज जाधव , डॉ .विक्रम मोरे , डॉ.मधुकर कोपनर , युवक नेते शहाजी राजेभोसले , बापू धोंडे , कर्जत तालुका दूध संघाचे अध्यक्ष व राशीनचे उपसरपंच शंकर देशमुख , शाहू राजेभोसले , विजय मोढळे , राम कानगुडे , उद्योजक बबन जंजिरे , नयन मंडलेच्या , डॉ. शिवाजी काळे , डॉ. बाळासाहेब कानगुडे , डॉ. विनायक जगताप , राशीनचे वैद्यकीय अधिकारी डॉ .दिलीप व्हरकटे , तुकाराम सागडे , डॉ. शिवाजी काळे , मेडिकल असोसिएशनचे रविंद्र काळे , रामकिसन साळवे, अखोणीचे सरपंच सचिन चव्हाण , यांच्यासह सर्व डॉक्टर्स , ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. नितीन खरात यांनी केले . आभार डॉ.युवराज शिंदे , डॉ.कृष्णकांत गावंडे यांनी मानले .