
कर्जत (प्रतिनिधी) :- प्रेम प्रकरणातून महाविद्यालयीन मुलीची पोटात चाकू खुपसून हत्या केल्याची घटना कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी बुद्रुक येथे मंगळवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली. प्रतिक लक्ष्मण काळे असे मुलीची हत्या केल्या युवकाचे नाव आहे.
मुलीची हत्या करून त्याने विषारी औषध घेतले. त्यानंतर त्याने स्वतःच्या अंगावर चाकूने वार करून केले. यात तो गंभीर जखमी झाला. मेहराज पठाण यांच्या रुग्णवाहिकेतून त्याला उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले. त्याच्यावर नगर येथे उपचार सुरू आहेत.
श्रावणी मोहन पाटोळे, वय १७, मूळ रा. हडपसर, पुणे असे हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे. मुलगी ही राक्षसवाडी बुद्रुक नजीकच्या वस्तीवर मामाकडे राहत होती. सचिन महादेव काळे असे तिच्या मामाचे नाव असून त्यांनी कर्जत पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
आरोपी प्रतिक लक्ष्मण काळे याच्याविरुद्ध कलम ३०२, ५४२ अन्वये कर्जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस अधिक तपास करीत आहेत.