राशिन ग्रामपंचायत नळ पाणीपुरवठा पाणीपुरवठा योजनेची चोरी उघड! कर्जत पोलिसात गुन्हा दाखल.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी. :- भीमा नदीवरून राशीन परिसरातील पाणीपुरवठा नळ योजनेची राबविण्यात आलेल्या १३ कोटी पाणी योजनेच्या मुख्य अडीच इंची जलवाहिनीलाच अडीच इंचीच पाईपची जोडणी करून एका हॉटेल व्यवसायिकांने हॉटेल व शेती फुलवण्यासाठी केलेल्या 💦 पाणी चोरीमुळे राशीन व परिसरात खळबळ उडाली आहे. जालिंदर लक्ष्मण नरसाळे रा. चौकीचा लिंब करपडी, असे या पाणी चोरी केलेल्या हॉटेल चालकाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,. राशीन भिगवन त्यावर कर्जत नगरपंचायत पाणीपुरवठा योजनेचे पदाधिकारी भाऊसाहेब तोरडमल, भास्कर भैलुमे, नेवसे व कर्मचारी हे कर्जत शहरास पाणी कमी दाबाने येत येत असल्यामुळे पाणी योजनेची पाहणी करण्यासाठी कर्जत वरून करपडी पर्यंत गेले असता चौकीच्या लिंबा जवळ कॅनॉल मध्ये पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी लिकेज असल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. तात्काळ त्यांनी जेसीबी बोलावून जोडलेल्या पाईपची खोदाई सुरू केली असता हा जोडलेला पाईप संबंधित शेतकऱ्याच्या शेतजमीनीकडे व हॉटेल कडे गेल्याचे निदर्शनास आले त्यावेळी ही चोरी राशिन जलवाहिनीची असल्याचे कळताच तोरडमल यांनी राशीन चे सरपंच, उपसरपंच यांना माहिती दिली. काही वेळातच राशीनचे ग्रामविकास अधिकारी रोहिदास कापरे यांनी घटनास्थळी येऊन सदर घडलेल्या घटनेची शहानिशा करून जालिंदर लक्ष्मण नरसाळे त्याने राशीन पाणीपुरवठा योजनेला अडीच इंची पाईप जोडून शेती आणि हॉटेल व्यवसायासाठी पाणी चोरी केल्याचे दर्शनात आले.
पाच महिन्यापासून प्रतिदिन अडीच लाख लिटर पाणी चोरी होत असून या पाण्याची अंदाजे किंमत सव्वा सात लाख रुपये होत असल्याचे राशींनचे ग्रामविकास अधिकारी रोहिदास कापरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी कर्जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भीमा नदीत पाणी असताना व कोट्यावधी रुपये खर्च करून चोरी केलेल्या पाण्यामुळे राशिनकर जनतेची तहान भागत नव्हती.
तब्बल आठ आठ दिवस राशींनच्या जनतेला पाण्यासाठी वणवण करावी लागली, पाणी चोरीमुळे पाण्याचा दाब व प्रेशर कमी झाल्याने नागरिकांचा घसा पाण्याविना कोरडाच राहिला हे नक्कीच, या पाणी चोरी प्रकरणी आणखी काही धागेदोरे लागण्याची व बडे राजकीय बगळे अडकण्याची शक्यता ना कारता येत नाही .पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे.