माजी मंत्री मा.हर्षवर्धन पाटील यांच्याकडून मोरे कुटुंबीयांची सांत्वन भेट

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी. :- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी खेड (ता.कर्जत) येथील स्व.नारायणराव मोरेपाटील (भाऊ) कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.भाऊंसोबत असलेल्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा देत माजी मंत्री पाटील यांनी भाऊंच्या कारकिर्दीचे कौतुक केले.’भाऊंबद्दल कायम आपुलकी असायची.
माझं तुम्हाला आवर्जून सांगणं आहे की, भाऊंचा वारसा यापुढे कुटुंबीयांनी जपावा. भाऊ शेवटपर्यंत जे रुबाबात जीवन जगले असे जीवन आजच्या काळात कुणी जगणार नाही. कोणत्याही अडचणीला हाक द्या, मी कायम तुमच्या पाठीशी असेल’,असा त्यांनी यावेळी विश्वास दिला. यावेळी भिगवण गावचे माजी सरपंच पराग जाधव, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती संजय देहाडे, निमंत्रित प्रदेश भाजप सदस्य मारुती वणवे, डिकसळ गावचे मा.उपसरपंच सुनील काळे, निरगुडे गावचे उपसरपंच हनुमंत काजळे आदी उपस्थित होते.