मणिपूरची घटना देशाला काळिमा फासणारी घटना मणिपूरमध्ये घडली-तुकाराम पवार

कर्जत (प्रतिनिधी) :- केंद्र सरकार व मणिपूर राज्य सरकारचा निषेध म्हणून कर्जत तालुक्यातील पारधी विकास समितीच्या वतीने कर्जत तहसीलदार यांना तसेच पोलिस स्टेशनला निषेधाचे निवेदन देण्यात आले.
३ मे पासून आतापर्यंत मणिपूर मधील कुक्की महिलांवर अत्याचार केले जात आहेत. कारगिल युद्धात शत्रूला पूरुन उरणाऱ्या जवानाच्या पत्नीला थाउबल या गावात विवस्त्र करून हजारो लोकांच्या समोर फिरवले. आसाम रायफलच्या निवृत्त सुभेदाराच्या पत्नीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. दोन समुहातील वादात महिलांना लक्ष करणे ही अत्यंत घृणास्पद गोष्ट आहे. ही एक घटना समोर आली म्हणून देश ढवळून निघतो अशा अनेक घटना मणिपूरमध्ये घडल्या आहेत. ३ मे पासून २८ जून पर्यंत मणिपूरमध्ये आतपर्यंत ५९६० एफ आय आर दाखल झाल्या आहेत. महिलांच्या छळा संबंधी तेथील सरकार व केंद्र सरकार एकच आहे पण हे सरकार या घटना थांबू शकले नाहीत. उलट आरोपींना प्रोत्साहन देण्याचे काम केले जात आहे. अडीच महिन्यानंतर एफ आय आर दाखल होऊनही अटक झालेली नव्हती.
सामाजिक दबाव वाढल्यानंतर आरोपींना अटक केली. अशा केंद्र सरकार व मणिपूर राज्य सरकारचा निषेध म्हणून कर्जत तालुक्यातील पारधी विकास कृती समिती व एकलव्य संघटना यांच्या वतीने कर्जत तहसीलदार यांना तसेच पोलिस निरीक्षक यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले. यावेळी फरीदा शेख, सुनिता काळे, विजया काळे, तेजल काळे, त्रिशाली काळे,मंगल गायकवाड,केसर माळी,अनिता बर्डे,छायाबाई बर्डे, नंदकुमार गाडे, प्रविण भोसले, दिसेना पवार, राहुल पवार, रंगीशा काळे, सोमनाथ गोरे, अंकुश गायकवाड, पंढरीनाथ गायकवाड,बाळु गायकवाड व अर्जुन माळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.