ईदगाह सुशोभीकरणाचे काम पूर्ण लवकरच लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करणार :- शोएब काझी

कर्जत (प्रतिनिधी) :- ” सबका साथ, सबका विकास ” हे ब्रीद घेऊन माजी मंत्री आमदार प्रा श्री राम शिंदे साहेब व खा डॉ . सुजयदादा विखे पाटील विकास कामे करत आहेत . राशिन येथील ईदगाह मैदानाच्या सुशोभिकरणासाठी त्यांनी जिल्हा विकास निधी मधून जन सुविधा अंतर्गत ९ लाख ५० हजार इतका निधी उपलब्ध केला होता त्याचे काम अतिशय सुंदर झाले असून त्यामुळे ईदगाह मैदानाचा कायापालट झालेला आहे . लवकरच त्याचा लोकार्पण सोहळा आ प्रा श्री राम शिंदे साहेब व खा . डॉ सुजयदादा विखे पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे . .. . धार्मिक कार्यासाठी या मैदानाचा उपयोग मुस्लिम समाजासाठी होतो त्यामुळे मुस्लिम समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे .
अशी माहिती श्री शोएब काका काझी भाजप जिल्हाध्यक्ष (अल्पसंख्याक ) यांनी दिली तसेच गेल्या 50 वर्षापासून रखडलेल्या ईदगाह सुशोभीकरणाचा महत्वकांशी प्रश्न मार्गी लागल्यामुळे आमदार प्राध्यापक राम शिंदे साहेब व खासदार सुजय दादा विखे यांचे राशीन मुस्लिम समाजा च्या वतीने आभार व्यक्त होत आहे