Advertisement
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र
Trending

बेकायदेशीरपणे माती व मुरुमाचे उत्खनन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

Samrudhakarjat
4 0 1 9 1 2

कर्जत (प्रतिनिधी) :- तालुक्यातील भोसे येथील मूळ रहिवासी असलेले भरत बापू खराडे व मुलगा तुषार उर्फ भैय्या भरत खराडे या दोघाविरुद्ध कर्जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासगी क्षेत्रातील जमिनीत बेकायदेशीररित्या माती व मुरुमाचे उत्खनन करून ते स्वतःच्या शेतात नेवून टाकल्याप्रकरणी झालेल्या वादातून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबतची अधिक माहिती अशी, भरत बापू खराडे यांनी कुळधरण येथील निलेश किसनराव जगताप व इतरांच्या मालकीच्या गट नंबर ९१३ मधील शेतामध्ये मशिनच्या सहाय्याने बेकायदेशीरपणे माती व मुरुमाचे उत्खनन केले. तसेच माती व मुरुमाची वाहतून करून त्याच्या व पत्नीच्या मालकीच्या ९१६ / १ मध्ये नेवून टाकला. दरम्यान निलेश जगताप यांनी त्यावर हरकत घेत तुम्ही कोर्टामार्फत मोजणी झाल्याशिवाय माती व मुरुम उचलू नका, असे सांगितले.

त्याचा राग आल्याने भरत खराडे व तुषार खराडे यांनी मी पुण्याहून पोर आणून तुमचा काटा काढून टाकीन, असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर निलेश जगताप यांनी दोघांविरुद्ध कर्जत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker