ब्रेकिंग
आरपीआय चे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र दामोदर यांना पत्रद्वारे जीवे मारण्याची धमकी राशीन पोलिसात अज्ञात व्यक्तिवर तक्रार दाखल.

Samrudhakarjat
4
0
1
9
5
1
राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी :- राशीन येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र तुकाराम दामोदर यांना पोस्टद्वारे निनावे पत्र पाठवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्रामध्ये १४ एप्रिल पर्यंत तुला मुदत देण्यात आली असून तू आमच्या गावाचा भावना आहेस, तू आमच्या विरोधात तक्रारी दिले आहेत. तू गावात दिसू नकोस तुला आम्ही मारून टाकणार आहे, असे निनावी पत्र अज्ञात व्यक्तीने पाठवले आहे. याबाबत रवींद्र दामोदर यांनी लेखी स्वरूपात तक्रार दिली असून अज्ञात व्यक्तीवर( एन.सी .) नोंदवण्यात आली असल्याची माहिती ठाणे अंमलदार एम.जी .काळे यांनी फोन द्वारे दिली आहे. या प्रकरणाबाबत रवींद्र दामोदर यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात लवकरात लवकर गुन्हा दाखल होण्याची मागणी केली आहे.