पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांची राशिन मुस्लिम समाजासोबत इफ्तार पार्टीचे आयोजन.

राशीन(प्रतिनिधी) जावेद काझी. :- राशीन येथील ईदगाह मस्जिद येथे बुधवार दिनांक १९/४/२३ रोजी सायंकाळी ७ वाजता कर्जत येथील पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांच्या वतीने तसेच रावसाहेब देशमुख पतसंस्थेच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारची फळे व फ्रुट देऊन रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुस्लिम समाज बांधवा सोबत पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे त्यांच्या पोलीस टीमने रोजा इफ्तारी करीत सामाजिक बांधिलकी व एकोपा चा संदेश देत मुस्लिम बांधवांना येणाऱ्या रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या,
यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने पोलीस निरीक्षक निरावडे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा टाेपी, शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शोएब काझी, जावेद काझी, साहिल काझी, बबलू भाई कुरेशी, जब्बार बागवान, राजू भाई शेख, अब्दुल काझी, आशु तांबोळी, समीर काझी, जोयब काझी, वाहाब मनेरी, शकील शेख, शेटे सर, व इतर मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.