काकासाहेब तापकीर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून हकालपट्टी
जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष काकासाहेब तापकीर यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते माजी मंत्री आ.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील कर्जत तालुका स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनेल मधून सोसायटीच्या सर्व साधारण जागेवरून निवडणूक लढवित असल्याने पक्ष विरोधी कारवाई केल्याबद्दल कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या वारं वाहू लागला असून या पार्श्वभूमीवर पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल कर्जत तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी हकालपट्टी केली आहे. त्यांच्यावर पक्ष विरोधी कारवाई केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
कर्जत बाजार समिती निवडणुकीची निवडणूक होत असून ही संस्था तालुक्यातील एक महत्त्वाची शेतकऱ्यांची संस्था असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व सहकारी संस्थेत राजकीय जोडे बाहेर ठेवले तरच सहकारी संस्थेचा विस्तार व विकास होईल म्हणून मी ही निवडणूक लढवित आहे व शेतकरी हितासाठी राजकारण बाजार समिती ची भरभराट व्हावी म्हणून व सहकारात पक्षीय राजकारण नसते मी पक्षीय राजकारण विरहित संस्था निवडणुक लढवित असल्याने मी पक्षविरोधी काम केले असा अर्थ होत नाही . काकासाहेब तापकीर