वरवंड येथील राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आदित्य कापसेचे यश

कर्जत (प्रतिनिधी) :- वरवंड ग्राम शिक्षण संस्थेचे, एकनाथ सिताराम दिवेकर महाविद्यालय, वरवंड जि. पुणे येथे ‘सातव्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा’ मंगळवार दिनांक १८ एप्रिल २०२३ रोजी संपन्न झाल्या. या स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालय, कर्जतच्या कु. भुते रोहिणी संजय (एफ.वाय.बी.ए) व कापसे आदित्य गंगाधर (अकरावी सायन्स-ब्) या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ‘वाढते चॅनल्स आणि घटचे वाचक’ या विषयावर आदित्य गंगाधर कापसे याने स्पर्धेत भाषण करून ११११ रुपयांचे ‘उत्तेजनार्थ’ बक्षीस संपादन केले. कु. रोहिणी संजय भुते हिला सहभाग प्रमाणपत्र मिळाले.
आदित्य कापसे याच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी अभिनंदन करून महाविद्यालयातर्फे त्याचा यथोचित सत्कार केला व भावी यशस्वी वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या. यावेळी कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा.मोहनराव खंडागळे व प्रा. प्रतापराव काळे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग यांनीही अभिनंदन केले. सदर स्पर्धकांना डॉ. प्रमोद परदेशी व प्रा. मीना खेतमाळीस यांनी मार्गदर्शन केले.