जागतिक वारसा दिनानिमित्त खर्डा किल्ल्यात स्वच्छता मोहीम

कर्जत (प्रतिनिधी) :- १८ एप्रिल हा ‘जागतिक वारसा दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून श्री. संत गजानन महाविद्यालय, खर्डा, रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालय, कर्जत व राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने खर्डा येथील ‘शिवपट्टण’ ऐतिहासिक किल्ल्याची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली.
या तीनही महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘वंदे मातरम, भारत माता की जय’ च्या घोषणा देत खर्डा येथील किल्ल्यावरील प्लास्टिक कचरा, काटेरी झाडे झुडपे काढून पूर्ण किल्ला परिसराची स्वच्छता केली.
या उपक्रमासाठी पुरातत्त्व विभाग, नाशिक येथील कार्यालयाने मार्गदर्शन केले. या मोहिमेत इतिहास विभाग प्रमुख डॉ. गणेश विधाते, प्रा. डॉ. देवकाते बी एन, प्रा. धनंजय जवळेकर तसेच् श्री संत गजानन महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला.