
कर्जत (प्रतिनिधी) :- मणिपूर घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध. अहमदनगर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महात्मा गांधी यांचे पुतळ्यासमोर काळी फित बांधून “मौन निषेध ” आंदोलन मणिपूरमध्ये महिलांच्या बाबतीत झालेली घटना ही देशाच्या इतिहासातील एक अत्यंत दुखद घटना असून अशा अन्याय व अत्याचार विरोधी असून केंद्र सरकारला या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी आज अहमदनगर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महात्मा गांधी यांचे पुतळ्यासमोर काळी फित बांधून व यांचे पुतळ्यासमोर काळी फित बांधून व मौन निषेध करण्यात आले व मणिपूरमध्ये झालेल्या महिलांवरील अत्याचाराबाबत निषेध करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, शहर कार्याध्यक्ष नामदेव पवार, अशोक बाबर, किसनराव लोटके, सिताराम काकडे, प्रकाश पोटे, पापामिया पटेल, फारूक रंगरेज, किसनलाल बेदमुथा, बबन भिंगारदिवे, फराज पठाण, निखील शेलार, उमेश भांबरकर, सागर शहाणे, अभिषेक जगताप आदीसह शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके म्हणाले, मणिपूरमध्ये महिलांच्या बाबतीत झालेली घटना ही देशाच्या इतिहासातील एक अत्यंत दुखद घटना असून याचे पडसाद देशातील विविध राज्यात सतत उमटत आहेत. राज्यात दोन समाजामध्ये वाढलेला तणाव लक्षात घेऊन मणिपूर राज्य सरकारतर्फे यापूर्वीच योग्य उपाययोजना व कठोर कार्यवाही करणे अपेक्षित असताना दुर्लक्ष केले. आज देशात महिलांवरील अत्याचार वाढत चालले असून कुणालाही कायद्याची भिती राहिलेली नाही हे वारंवार घडणाऱ्या काही घटनांवरून स्पष्ट होत चालले आहे. यामुळे देशातील सर्व महिला वर्गामध्ये तीव्र असंतोष आहे ही वस्तुस्थिती कुणालाही नाकारता येणार नाही. अशावेळी केंद्र सरकारतर्फे कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर म्हणाले, मणिपूरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून संवेदनशील परिस्थिती असताना देखील केंद्र व मणिपूर राज्य सरकारने अद्यापपर्यन्त मौन बाळगलेले आहे. त्यानंतर विविध समाजमाध्यमांनी मणिपूरमधील महिलांवरील अत्याचाराचा हा मुद्दा उचलल्यावर देखील केंद्र सरकारने हस्तक्षेप केला नाही हे विशेष. शेवटी सर्वोच्च न्यायालयाला केंद्र सरकारला खडे बोल सुनवावे लागले हे सरकारचे दुर्देव आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अशा अन्याय व अत्याचार विरोधी असून केंद्र सरकारला या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी आज महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्यासमोर काळी फित बांधून व निषेध मौन बाळगून मणिपूर मध्ये झालेल्या महिलांवरील अत्याचाराबाबत निषेध करण्यात आला व या घटनेतील दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.