ब्रेकिंग
राशिन मधील ज्ञानेश्वर साळवे या तरुण णाचा ओवरीवरून खाली पडून दुर्दैवी मृत्यू.

Samrudhakarjat
4
0
1
9
5
1
राशीन (प्रतिनिधी) :- जावेद काझी.पारवा पकडण्यासाठी दुपारी ४.३० सुमारास गेलेल्या राशीन मधील ज्ञानेश्वर उर्फ पिंटू साळवे वय वर्ष 42 पेशा ड्रायव्हर याचा दुर्दैवी मृत्यू झाला. राशीन ग्रामपंचायत समोर असलेल्या काशी विश्वेश्वर मंदिराच्या ओवरीवऱील कपारीत असलेल्या पाडव्याला पकडताना पिंटू साळवे याचा तोल जाऊन खाली असलेल्या दगडी फरशीवर पडला त्यात तो गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.
ज्ञानेश्वर उर्फ पिंटू साळवे यांचा अंत्यविधी रात्री ८.३० वाजता झाला. याच्या अचानक जाण्याने राशिन परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील, असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते तसेच बौद्धाचार्य पोपट साळवे यांचा तो मुलगा होत.