अभय क्लॉथ च्या दुसऱ्या शाखेचा शुभारंभ

कर्जत प्रतिनिधी :- आज ‘कापड’ खरेदीसाठी संपूर्ण कर्जत तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या अभय क्लॉथ या दुसऱ्या शाखेचा कर्जत शहरातील नवी पेठ येथे मोठ्या दिमाखात शुभारंभ करण्यात आला
कर्जत गावातून बाहेर व्यवसाय करण्याच्या इच्छेने अत्यंत कठिण परिस्थित कुलधर रोड येथे कर्जत मध्ये युवा उद्योजक अभय बोरा यांनी मोठ्या धाडसाने सर्व प्रथम शहराच्या बाहेर आपल्या व्यवसायाची सुरवात करत कर्जत तालुक्यातील प्रत्येक ग्राहकाच्या च्या मनावर राज्य करत
शहरा बाहेर आपला व्यावसाय सुरूवात केला. व्यवसायातल्या खाचा-खोचा माहिती करून घेत उत्तम सेवा देण्यासाठी प्रसिद्ध अशा या शोरूमने बोरा यांना कोणत्याही व्यवसायात जम बसविण्याचा विश्वास प्राप्त झाला, आणि कापड व्यवसायात महिलांसाठी स्वतंत्र मॉल उभा करण्याची कल्पना त्यांच्या मनात जोर धरू लागली.
विवाह समारंभ म्हटले की मोठी खरेदी… देण्या-घेण्याच्या साड्यांपासून वधूवस्त्रापर्यंत सर्वांनाच असंख्य प्रकारच्या साड्या आणि त्यातही पैठणीसारखं ‘महाराष्ट्राचं महावस्त्र’ आयुष्यात एकदा तरी हौस म्हणून खरेदी करण्यासाठी महिलावर्गाची आवड त्यांनी हेरली. त्यातूनच त्यांनी कुलधर रोड या ठिकाणी आपल्या पहिल्या अभय क्लॉथ ची सुरवात केली
कर्जत शहरात नामवंत व्यापार्यांनी थाटलेल्या व्यवसाय असताना कर्जत शहरातील कुळधरण रोड वर अगदी शेवटच्या टोकाला थाटलेल्या या दोन मजली शोरूमला महत्त्व प्राप्त करून देणे हे खरंतर अत्यंत अवघड काम! चोखंदळ कर्जतकरांच्या पसंतीला उतरायचे म्हणजे रोज नवनव्या आव्हानांना तोंड देणे, पण जिद्दीने आणि चोख व्यवहाराने अभय क्लॉथ ने हळूहळू आपला जम बसविला.
उत्तम सेवा आणि प्रभावी प्रचार-प्रसिद्धीच्या आधारावर ‘अभय’ नावाचे गारूड अवघ्या महिलावर्गावर होऊ लागले. ‘श्रीमंतांनी स्वप्न पहावे आणि त्यांच्या घरातील महिलांनीच पैठणी खरेदी करावी’ ही कल्पना पडद्या आड जात होती. प्रत्येक लग्नसमारंभात नववधूबरोबर विहिणींपासून करवल्यांपर्यंत प्रत्येकीच्या अंगावर पैठणी दिसू लागली. संपूर्ण कर्जत शहरात फक्त एकच शोरूम असून देखील तालुक्याच्या कानाकोपर्यात अगदी लहान गावापर्यंत अभय बोरा बरोबर ‘अभय क्लॉथ’चे कपडे साड्या जाऊन पोहोचल्या. आज लग्नबस्त्यासाठी अवघ्या कर्जततून तालुक्याच्या बाहेरून ‘अभय क्लॉथ’कडे महिला वर्ग धाव घेत आहे.
वाढती मागणी लक्षात घेऊन अभय बोरा यांनी कुळधरण रोड वरील रस्त्यावरील शोरूमबरोबरच कर्जत मधील नवी पेठ येथे हि त्यांनी दुसऱ्या शाखेचे भव्य दिमाखात उभारणी केली आहे . कर्जत तालुक्याबरोबरच करमाळा कडा श्रीगोंदा येथील हि ग्राहकाची लग्न सोहळ्यासाठी खरेदीची वाट कर्जतकडे अभय क्लॉथ येथे वळाली.
फक्त पैठणीच नव्हे तर गढवाल, इरकली, बनारसी, राजमाता अशा असंख्य व्हरायटीज एकाच ठिकाणी मिळू लागल्या आणि ‘अभय क्लॉथ’ने आपले नांव महिलांच्या हृदयात कायमचे कोरून ठेवले.
तरूण पिढीला साड्या आणि ड्रेस मटेरियल व्यतिरिक्त वेस्टर्न वेअरचे आकर्षण आहे. सणासमारंभाला ठेवणीतल् या साड्या आणि पंजाबी ड्रेस वापरणार्या नव्या पिढीला जीन्स, टी शर्ट्स आणि अन्य आधुनिक वेस्टर्न वेअर्सच्या भरपूर व्हरायटीज रास्त किंमतीत येथे मिळू शकतात. त्याच बरोबर या नवीन शाखेच्या शुभारंभ प्रसंगी त्यांनी कर्जत तालुक्या बरोबरच इतर हि तालुक्यातील 2000 लोक संख्या असलेल्या गावान मध्ये फ्राचायसी देणाचा मानस व्यक्त केला .
या नविन शाखेचा शुभारंभ कर्जत नगरपंचायतीच्या महिला स्वच्छता कर्मचारी यांच्या शुभ हस्ते करत शहरापुढे एक नवीन आदर्श घालुन दिला .
या प्रसंगी कर्जत जामखेड चे लोकप्रिय आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार नगराध्यक्षा उषा राऊत उपनगराध्यक्षा रोहिणी घुले नगरसेविका छाया शेलार प्रतिभा भैलुमे ताराबाई कुलथे जोती शेलके लंका खरात नगरसेवक नामदेव राऊत भाऊसाहेब तोरडमल रवी सुपेकर भास्कर भैलुमे ओंकार तोटे राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष सुनिल शेलार विशाल मेहेञे सचिन पोटरे प्रसाद ढोकरीकर देविदास खरात
डॉ विद्या काकडे उल्का केदारी
श्रीमती उजवलाबाई बोथरा पठाण मँडम देसरडा मामीजी
सर्व व्यापारी बांधव
ऍड अशोक कोठारी
प्रसाद शाह डॉ प्रकाश भंडारी
विजय खाटेर सर्व सामाजिक संघटनेचे सर्व स्वच्छता शिलेदार याच्या उपस्थित संपन्न झाला