कर्जत पोलिस स्टेशनची अवैध धंद्यांवर धडाकेबाज कारवाई

कर्जत (प्रतिनिधी) : – दि. 01/09/2023 रोजी परि. पोलीस उपअधिक्षक अरुण पाटील स्टाफसह कर्जत पोलीस स्टेशनच्या अंतर्गत राशिन दुरक्षेत्र हद्दीत पेट्रोलिंग करताना पाटील यांना गुप्त बातमी दारामार्फत माहीती मिळाली परीटवाडी राशीन ता. कर्जत गावचे शिवारात शेतामध्ये काही व्यक्ती जुगार खेळत आहेत. अशी माहिती मिळाल्याने तात्काळ पोलीस उपअधिक्षक अरुण पाटील यांनी स्वतः स्टाफसह सदर ठिकाणी जावुन छापा टाकून जुगार खेळणाऱ्या अनिल बबन माने, जिवन संभाजी साळवे, दत्तात्रय दादाराम राउत, पोपट अशोक चिंचकर, अजय महादेव घोणे, कृणाल राधेश्याम वर्मा बाळु तुकाराम दामोदरे, विशाल तुकाराम माळवदे असे जुगार खेळताना पकडले आहे. त्यांची झडती घेतली असता त्यांचेकडे रोख रक्कम, जुगार साहित्य, दुचाकी, चारचाकी वाहने, मोबाईल असा एकुण 8,93,750 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आला सदरचा मुद्देमाल पोहेकाँ काळे यांनी सविस्तर पंचनामा करुन जप्त केला आहे.