दोन सराईत आरोपींना कर्जत पोलिसांकडून अटक.

कर्जत (प्रतिनिधी) :- राशीन जवळील करपडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर येथे कर्जत पोलिसांनी गोपनीय माहितीवरून कोंबिंग ऑपरेशन राबवून दोन आरोपींना अटक केले आहे.
आरोपी मनचक्क्या विष्णू भोसले वय 47 वर्षे आणि मयूर मयूर मनचक्क्या भोसले, वय 22 वर्षे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामधील आरोपी मनचक्कया भोसले हा हायकोर्टात उच्च न्यायालय येथे हजर होत नसल्याने माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी अटक करण्यासाठी अटक वॉरंट जारी केले होते. त्याचा शोध कर्जत पोलीस घेत होते. खेड येथे काही दिवसांपूर्वी किराणा दुकानात चोरी करून तेलाचे डबे आणि इतर साहित्य व काही रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून न्हेली होती. सदर गुन्ह्यांमध्ये आरोपी मयूर मनचक्या भोसले यास अटक करण्यात आले आहे. आरोपी मनचक्या भोसले याचे वर यापूर्वीचे चोरी खून मारामारी असे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावित पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे पोलीस जवान श्याम जाधव पांडुरंग भांडवलकर गोवर्धन कदम भाऊ काळे अर्जुन पोकळे संपत शिंदे मारुती काळे संभाजी वाबळे अमोल लोखंडे यांनी केली आहे.