राशीन येथे शिवजयंती निमित्त हिंदवी स्वराज्य युवा प्रतिष्ठान च्या वतीने भव्य निकाली कुस्त्याचे जंगी मैदान संपन्न!

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी :-छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त हिंदवी स्वराज्य युवा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष, तसेच परीट वाडीचे सरपंच पैलवान विलास नाना काळे मित्र मंडळ( वर्ष 10) वे राशीन यांच्यावतीने शुक्रवार दिनांक २४.२.२०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता पिराचा मळा परीट वाडी( राशीन) येथे भव्य निघाली कुस्त्याचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले होते.
महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून अनेक नामांकित पैलवान मोठ्या संख्येने उपस्थित राहत आपला पैलवानी डावाची चुनुक दाखवीत जमलेल्या प्रेक्षकांची मने जिंकत डोळ्याचे पारणे फेडणारे मनमोहक चितपट कुस्त्या यावेळी बघावयास मिळाल्या,
आलेल्या अनेक मल्यांनी डंके की चाेट पर काटा कुस्त्या करीत अनेकांना आसमान दाखवले यावेळी कर्जत जामखेड चे पाणीदार आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते , मनोज माने × सतपाल सोनटक्के या दोन्ही पैलवानांची कुस्ती लावण्यात आली यामध्ये सतपाल सोनटक्के विजयी झाला त्याने 51000 हजार रुपयाचे बक्षीस जिंकले, तसेच दोन नंबर ची लढत प्रशांत जगताप × सचिन केचे या पैलवाना मध्ये झाली यामध्ये प्रशांत जगताप याने बाजी मारत विजय होत त्याने एक लाख 11 हजार रुपयाचे रोप बक्षीस जिंकले तर शेवटची नंबर एक ची कुस्ती मध्ये माऊली कोकाटे × आली इराणी या दोघांमध्ये लढत झाली या लढतीत माऊली कोकाटे यांनी पैलवान अली इराणी यांना आसमान दाखवीत विजय नोंदवला यावेळी पैलवान कोकाटे यांना एक लाख 51 हजार रुपयाचे रोख बक्षीस व चांदीची गदा भेट देण्यात आली .या वेळी पंच म्हणून पै .श्याम कानगुडे, प्रवीण घुले, बंडाभाऊ माेढळे., दत्ता गायकवाड, विजय नाना माेढळे, काका शेळके, विठ्ठल भंडारे परीट वाडीचे सरपंच विलासराव काळे या माजी पैलवानांनी काम पाहिले. यावेळी अनेक कुस्ती प्रेमी व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.