मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त हशु आडवाणी विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप .

राशीन ( प्रतिनिधी) जावेद काझी. :-आज राशीन येथे हशु आडवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत तालुका शिवसेना व युवासेना यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी शिवसेना तालुकाप्रमुख बापूसाहेब नेटके मेजर व युवा सेना तालुकाप्रमुख सोमनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी संस्थेचे संचालक भाजपा युवा नेते साहिल दादा काझी यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत व संस्थेच्या वतीने फेटा बांधून सत्कार केला.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक विद्यालयाचे प्राचार्य श्री राजेंद्र नष्टे सर यांनी सर्वांचे स्वागत करून कार्यक्रमांची रुपरेषा सांगीतली त्यानंतर मारुती आबा काळे यांनी संत तुकडोजी महाराजांचे भारुड गीत व देशभक्ती गीत गायन करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले यानंतर संस्थेचे संचालक युवा नेते साहिल दादा काझी यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल शिवसेना युवा सेना सर्व पदाधिकाऱ्यांचे विशेष कौतुक केले
व बाभूळगाव शिंपोरा करपडी परीटवाडी ते कर्जत या नवीन बसचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सुरु करण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे वतीने आभार मानले व मुख्यमंत्री यांच्या वाढदिवस निमीत्त टाळ्यांवाजून अभिनंदन केले त्यानंतर कर्जत तालुका युवा सेना प्रमुख सोमनाथ शिंदे यांनी मनोगत व्यक्त करताना स्वर्गीय खासदार दिलीप गांधी व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अल्लाउद्दीन काझी यांच्या मैत्री संबंधांचे विविध पैलू सांगून त्यानिमित्ताने माझी व काझी कुटुंबीयांची खरी ओळख तिथून सुरुवात झाली व नंतर युवा सेनेचे काम चालू केल्यानंतर युवा नेते साहिल काझी यांनी भावासारखी खूप मदत केली व ज्येष्ठ नेते अल्लाउद्दीन काझी यांनी कायम वडीलकीचा सल्ला दिला व कुटुंबातील सदस्य असल्यासारखी वागणूक दिली
व त्यातूनच त्यांच्या संस्थेवर काहीतरी कार्यक्रम घेण्याचा निश्चय मनात बाळगला व आज मुख्यमंत्री महोदयांच्या वाढदिवस निमित्त छोटेखाणी कार्यक्रमाचे निमित्ताने भेट दिली परंतु इथपर्यंत न थांबता येणाऱ्या काळात संस्थेचे कामकाज इमारत विद्यार्थी संख्या पाहता या पाठीमागची संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अल्लाउद्दीन काझी यांची मेहनत व खरे कार्य समजले त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांची 71 वी देखील संस्थेच्या नुतन ईमारतीत या ठिकाणी मंत्रिमंडळातील मंत्रीगण आणुन मोठ्या प्रमाणात आयोजन करून भव्य दिव्य साजरी केली जाईल असे जाहीर केले त्यानंतर तालुकाप्रमुख बापूसाहेब नेटके मेजर यांनी देखील या विधायक उपक्रमाला व राशीनच्या लोकनेत्याचा शिवसेनेच्या वतीने सन्मान करण्याचे जर भाग्य आम्हाला लाभत असेल तर ते आम्ही खूप जोमाने करू अशी ग्वाही दिली व संस्थेचे सर्व शिक्षक कर्मचारी वृंद यांचे आभार मानून मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व हा कार्यक्रम राबविण्याचा पदाधिकाऱ्यांना मान दिल्याबद्दल विशेष कौतुक करून इथून पुढील काळात संस्थेच्या जडणघडणीत व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन पाठीशी राहण्याची ग्वाही दिली. यावेळी अध्यक्षीय भाषण म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अल्लाउद्दीन काझी यांनी महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब हे महाराष्ट्रभर करत असलेल्या विविध शासकीय योजना याची इत्यभूत माहिती दिली व मुख्यमंत्री महोदयाचे विशेष आभार व्यक्त करून त्यांना भावी उदंड आयुष्यासाठी संस्थेच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या व हा कार्यक्रम राबवल्याबद्दल शिवसेना युवासेना कर्जत तालुका सर्व पदाधिकाऱ्यांचे विशेष आभार मानले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे प्राध्यापक विठ्ठल काळे सर यांनी केले या कार्यक्रमासाठी तालुकाप्रमुख बापूसाहेब नेटके मेजर,युवा सेना प्रमुख सोमनाथ शिंदे,दिघी गावचे सामाजिक कार्यकर्ते राजेश भैय्या निंबाळकर,भीम आर्मीचे तालुकाप्रमुख दादासाहेब सोनवणे,ज्येष्ठ नेते आबा काळे,सुदर्शन जगताप,प्रहार युवक तालुका अध्यक्ष स्वप्निल देशमुख, ज्येष्ठ नेते आबा काळे,विकास भवर,सौरभ काळे प्रकाश काळे,शुभम दंडे,अवधूत खैरे,दीपक कराळे,नाना काळे, रोहन गाडे,ओंकार भवर,विशाल काळे व सर्व शिवसैनिक, युवासैनीक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.