भास्कर भैलुमे मिञ मंडळाच्या वतीने सामाजिक संदेशातुन महामानवास अभिवादन

कर्जत (प्रतिनिधी):- भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कर्जत शहरासह तालुक्यात उत्साहात साजरी करण्यात आली.
कर्जत शहराच्या प्रमुख चौक छञपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी व रस्त्यावर उभारण्यात आलेले संदेशातुन सर्वाचे लश्र वेधले भीम ध्वज सुरेल आवाजात सुरू असलेले भीम गीत छञपती शिवाजी महाराज चौकात केलेलीं विद्यत्त रोषणाई डोळ्यांचं पारणं फेडणारी होती. डॉ बाबासाहेब यांची आकर्षक मुर्ती आणि त्यावर केलेली फुलांची आरास फटाक्यांची आतिषबाजी भास्कर भैलुमे मिञ मंडळाच्या वतीने कर्जत मधील छञपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी
केलेल्या सजावटीने प्रतिमा पुजन व बुध्द वंदना साठी सामील झालेल्या मोठ्या संख्येने भीम सैनिका मुळे वातावरण भारावुन गेले होते.
भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ किंवा ‘आधुनिक भारताचे निर्माते’ असेही म्हणतात. यंदाची हि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती कर्जत शहरामध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि आनंदात सर्वधर्मीय नागरिकांच्या उपस्थित छञपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी भास्कर भैलुमे मिञ मंडळाच्या वतीने साजरी करण्यात आली .
महामानव डॉ बाबासाहेब आंबडेकर यांच्या पुतळ्याला आकर्षक अशी विद्युतरोषणाई छञपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आली होती
शहरातील भीम अनुयायी आणि प्रेमींनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात छञपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी गर्दी केली होती.
यावेळी मा जिप सदस्य प्रविण घुले राष्ट्रवादी चे माजी शहराध्यक्ष सुनिल शेलार राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष विशाल मेहेञे उपनगराध्यक्ष रोहिणी घुले नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल नगरसेवक रविंद्र सुपेकर गटनेते संतोष मेहेञे नगरसेवक अमृत काळदाते नगरसेविका प्रतिभा भैलुमे नगरसेविका छाया शेलार नगरसेविका जोती शेळके नगरसेविका अश्विनी दळवी उपस्थित होते हा कार्यक्रम पाडण्यासाठी अनुराग भैलुमे निलेश भैलुमे सचिन धेडे सचिन गोरे बाळासाहेब समुद्र रावसाहेब खराडे सचिन आखाडे, अलताफ झारेकरी सुमित भैलुमे किरण भैलुमे सुरेश गोरे संतोष जाधव राजेंद्र येवले अश्रय शिरसागर मनोज राऊत किशोर कांबळे सुरज कदम राजेद्र भैलुमे सुशांत भैलुमे आदि भिम सैनिकांनी परिश्रम घेतले.