हशु आडवाणी विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा…..!

कर्जत (प्रतिनिधी) :- भारतीय ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हशु आडवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम ज्येष्ठ पत्रकार मा. जावेदजी काझी यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी समाज विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.अल्लाउद्दीन एस.काझी , सामाजिक कार्यकर्ते मा.तात्यासाहेब माने, मा.श्री.नवनाथ राऊत मा.साहिल दादा काझी पालक व विद्यार्थी
इ.मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मा.श्री.राजेंद्र नष्टे सर
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.विठ्ठल काळे सर यांनी केले.श्री.शिंदे आजिनाथ सर
यावेळी कु.विद्या काळे , कु.प्रतिक्षा काळे,कु.राधा काळे यांनी देशभक्तीपर गीतगायन केले.अध्यक्ष निवड कु.अक्षरा कांबळे हिने केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.प्रिती पवार आणि कु.कोमल गवळी यांनी केले.
उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस सागर पंडित यांच्या वतीने खाऊचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आभार श्री. सतिश शिंदे सर यांनी मानले.