दादा पाटील महाविद्यालयात शिक्षक दिन विविध उपक्रमांनी साजरा

कर्जत (प्रतिनिधी) :- डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त ‘शिक्षक दिन’ संपूर्ण भारतभर शिक्षण दिन साजरा करण्यात येतो. रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयातही हा शिक्षक दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक यांचा गुलाबपुष्प व भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जगदंबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, राशीनचे माजी प्राचार्य श्री. दिलीप खंडागळे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर होते. याप्रसंगी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री. सुभाषचंद्र तनपुरे, खजिनदार प्रा. प्रकाश धांडे , श्री.अनिल तोरडमल, श्री. अनिल पटारे, श्री. सुनील गाडेकर तसेच महाविद्यालयातील सर्व उपप्राचार्य, महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर सेवक व मोठ्या संख्येने विद्यार्थीवर्ग उपस्थित होता.
शिक्षक दिनानिमित्त महाविद्यालयातील विविध विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या भूमिकेत येऊन अध्यापन केले. त्यामध्ये प्रणिता पांढरे, भाग्यश्री लांडगे, पौर्णिमा जाधव, गीतांजली वाळुंज, साक्षी गंगावणे, ओंकार कांबळे, वैष्णवी गायकवाड, ऋषिकेश पाचपुते, वैष्णवी दिवटे, प्रणाली निंबाळकर, शिवानी गायकवाड, भाग्यश्री कांबळे, प्रांजली नलवडे, निकिता फाळके, गौरी फाळके, प्राजक्ता भंडारी, साक्षी कुऱ्हाडे आदि विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका आज निभावली.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयातील वृषाली परदेशी, गीतांजली वाळुंज, प्रणिता पांढरे, वैष्णवी गायकवाड, भाग्यश्री लांडगे, पौर्णिमा जाधव, वैष्णवी परदेशी, प्रणाली निंबाळकर, प्रांजली नलवडे, वैष्णवी दिवटे, ऋषिकेश पाचपुते, प्रतीक्षा कांबळे, संकेत कसबे, सुजाता कोल्हटकर, गायत्री जायभाय, साक्षी वाघ, दिक्षा गेळे, रोहिणी भुते, ऋतुजा शेटे, ओम कांबळे, वैभवी तोरडमल, साक्षी सुपेकर, समृद्धी बोरा, मोनाली भरणे, शामल उकिरडे, वैष्णवी सांगळे, धनश्री जाधव या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रमुख पाहुणे श्री. दिलीप खंडागळे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या मनात उतरणे हे कठीण काम असते परंतु शिक्षक हे काम करतो. शिक्षकाच्या प्रत्येक कृतीकडे समाजाचे बारकाईने लक्ष असते. शिक्षकाला आपला लौकिक कायम ठेवावा लागतो. दादा पाटील महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी म्हणून मला महाविद्यालयाने घडवल्यामुळेच महाराष्ट्र राज्याचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याची कबुली यानिमित्ताने त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांकरिता केलेला आजचा ‘शिक्षक दिन’ हा कार्यक्रम महत्त्वाचा असल्याचे नमूद केले. शिक्षण ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. प्रत्येकजण आयुष्यभर विद्यार्थीच असतो, तो काही ना काही सातत्याने शिकत असतो
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त ५५ ग्रंथ महाविद्यालयाला भेट दिले. तसेच महाविद्यालयाच्या गरीब विद्यार्थी फंडास पाच हजार रुपयाची मदतही त्यांनी या कार्यक्रमामध्ये कार्यालयीन प्रमुख श्री विलास मोढळे यांच्याकडे सुपूर्त केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. नुपूर लहाडे, सूत्रसंचालन स्वेता काकडे, साक्षी गंगार्डे, अंकिता वाघ यांनी तर आभार तन्वी लाढाणे यांनी मानले. या विद्यार्थ्यांना प्रा. राम काळे व स्वप्नील म्हस्के यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सांस्कृतिक विभाग व स्टाफ वेल्फेअर विभागाच्या वतीने करण्यात आलेला होता.