सलाम इंडिया राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल जावेद काझी यांचा राशीन मध्ये विविध ठिकाणी सत्कार

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी :- नवी मुंबई वाशी येथे नुकताच पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्काराच्या भव्य मंचावर राशीन येथील समृद्ध कर्जतचे पत्रकार जावेद काझी यांना सलाम इंडिया राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान चिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
या पार्श्वभूमीवर राशीन येथे पै. श्याम भाऊ कानगुडे मित्र मंडळ, शाहू राजे भोसले मित्र मंडळ, शिवसेनेचे माजी शहर प्रमुख गणेश मोढळे, आर पी आय चे उपजिल्हाध्यक्ष रवींद्र दामोदर, अविनाश मासाळ, व इतर ग्रामस्थ व मान्यवरांनी मिळालेल्या पुरस्काराबद्दल जावेद काझी यांचा फेटा बांधून पेढे भरवीत विविध ठिकाणी सत्कार करण्यात आला. यावेळी शाहू राजे भोसले, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राम कानगुडे, अशोक जंजिरे, विजय नाना मोढळे, भास्कर मोढळे, दत्ता आबा गोसावी, तात्यासाहेब माने, संजय ढगे, जालु आप्पा मोढळे, प्रसाद मैड, संतोष सरोदे, नवनाथ कानगुडे, नितीन कानगुडे, राजेंद्र नष्टे, इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.