नेत्यांच्या सहकार्याने होतोय कोरेगाव चा विकास : पै बापूसाहेब शेळके

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्यातील कोरेगाव या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या ग्राम पंचायतीसाठी खा. डॉ सुजय विखे यांनी मोठ्या प्रमाणात निधी देऊन विकास कामांचा धडाका लावला असल्याची माहिती सरपंच व भाजपा नेते बापूसाहेब शेळके यांनी दिली आहे.
कर्जत तालुक्यातील कोरेगाव हे अत्यंत महत्वाचे व राजकीयदृष्ट्या संवेदनशील गाव असून याठिकाणी भाजपानेते बापूसाहेब शेळके यांनी ग्राम पंचायत ताब्यात घेत विविध विकास कामासाठी खा. डॉ सुजय विखे यांच्या कडे पाठपुरावा केल्यानंतर कोरेगाव साठी खा. विखे यांनी विवीध विकास कामासाठी १ कोटी पेक्षा जास्त निधी दिला असून यातील अनेक कामे पूर्ण होत आली असून अनेक कामे प्रगती पथावर आहेत. तर पालक मंत्री राधाकृष्ण विखे व आ. प्रा. राम शिंदे यांनी ही मोठ्या प्रमाणात निधी दिल्याने पालकमंत्री, खासदार व आमदार या तीघांचे ही कोरेगाव ग्राम पंचायती वर विशेष लक्ष आहे.
खा. डॉ. सुजय विखे यांनी दिलेल्या निधीमध्ये बसवन ओढयावरील बंधारा साठी १५ लक्ष, आंबोळ ओढावरील बंधारा साठी १५ लक्ष, नागरी सुविधा योजनेतुन परदेशीसर घर ते विठ्ठ्ल रुख्मिणी मंदिर हा श्री कोरेश्वर रथ मार्ग असलेला रस्त्याचे काँक्रीटीकरन करण्यासाठी १५ लाख, कोरेगाव अंतर्गत दिवाबत्ती बसविण्यासाठी ५ लक्ष रुपये, पर्यटन विकास अंतर्गत क वर्ग देवस्थान श्री कोरेश्वर मंदिर परिसरात ब्लॉक बसविण्यासाठी १० लाख, सटवाईवाडी येथे सटवाई मंदिर परिसरात ब्लॉक बसवणे साठी १० लक्ष रुपये, पोखरण रस्ता मुरमीकरन खडीकरन करणे व सिडी वर्कसाठी साडे बारा लक्ष, जैन स्थानक सभामंडप साठी साडेसात लक्ष, मुरकुटवाडी येथे अनु. जाती व नवबौद्ध घटकांचा विकास कामा अंतर्गत ब्लॉक बसवणे ८ लक्ष, हाडोळावस्ती येथे अनु. जाती व नवबौद्ध घटकांचा विकास कामा अंतर्गत पाणीपुरवठा करणे ८ लक्ष, सटवाईवाडी येथे डी पी सिंगल फेज योजने साठी ५ लक्ष, गलांडवाडी येथे सभामंडप बांधने ७ लक्ष, कोरेगाव अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ४३३ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. कोरेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले आहे. याशिवाय मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत कोरेगाव ते आळसुंदा या सात किमी रस्त्यास मंजुरी मिळाली आहे. गावातील कचरा गोळा करण्यासाठी एक घंटागाडी देण्यात आली असून कोरेगाव व परिसरातील बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी कीमान कौशल्य अंतर्गत कोरेगाव येथे केंद्र केले गेले असून या अंतर्गत प्रशिक्षण वर्ग सुरू असून यामाध्यमातून मिळणाऱ्या प्रमाणपत्राचा लाभ युवकांना होणार आहे. ओम नमो ग्राम सचिवालयासाठी विशेष प्रयत्न सुरू असून ते लवकरच मंजूर होण्याची शक्यता आहे.
यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे, आ. प्रा. राम शिंदे, व खा. सुजय विखेच्या विशेष प्रयत्नांतून कोरेगाव ग्राम पंचायती साठी भरभरून निधी दिला जात असून यामुळे कोरेगाव ग्राम पंचायतीच्या वतीने या सर्वांना धन्यवाद देण्यात आले आहेत. सदरची कामे मंजूर करण्यासाठी माजी सरपंच बापूसाहेब शेळके यांनी विशेष पाठपुरावा केला असून या माध्यमातून कोरेगाव मधील ग्रामस्थांना विशेष लाभ होत असल्याची माहिती सरपंच शशिकला हनुमंत शेळके, उपसरपंच श्रीकांत निवृत्ती वाघ, यांनी दिली आहे. यावेळी ग्राम विकास अधिकारी प्रताप साबळे, ग्राम पंचायत सदस्य ताई दादासाहेब कोळेकर, रोहिदास विठ्ठल अडसूळ, सुषमा विजय पाचपुते, अंजली विजय मुरकुटे, मालन शिवाजी मुरकुटे, आदी उपस्थित होते.