
कर्जत (प्रतिनिधी) :- आज दि. 9 ऑगस्ट रोजी श्री संत सद्गुरु गोदड महाराज यांच्या पावन भूमीमध्ये व सिद्धार्थ बोर्डिंग कर्जत या ठिकाणी ग्रामीण विकास केंद्र जामखेड आयोजित जागतिक आदिवासी क्रांती दिनानिमित्त मा.ॲड. दत्ता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी मेळावा घेण्यात आला.
आदिवासी मेळावा कार्यक्रमाची सुरुवात झलकारी बाई,बिरसा मुंडा,वीर शौर्य एकलव्य या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमासाठी आलेले प्रमुख पाहुणे मा.श्री.प्रदीप शेंडगे साहेब (गटविकास अधिकारी पंचायत समिती कर्जत) मा.श्री.अरुण पाटील साहेब (पोलीस उपअधीक्षक कर्जत पोलीस स्टेशन) मा.श्री प्रा. विक्रम कांबळे,चांगदेव सरोदे,फारूक बेग,संतोष आखाडे,महादेव बर्डे,सोमनाथ भैलुमे,यांचा ग्रामीण विकास केंद्र संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला.तसेच आदिवासी संस्कृती जोपासली पाहिजे हे लक्षात घेऊन एका आदिवासी अनुष्का काळे या मुलीने आदिवासी गाण्यावर नृत्य सादर केले.
यावेळी मा.श्री.अरुण पाटील साहेब म्हणाले की जागतिक आदिवासी क्रांती दिवस साजरा करणे महत्त्वाचे आहे.आज आपण अनेक सण-उत्सव मोठ्या थाटामाटात साजरे करतो.त्याचप्रमाणे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी क्रांती दिवस आपण मोठ्या उत्साहाने आपुलकीने आणि आपलेपणाने साजरा करावा तसेच आदिवासी बांधवांनी शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे असे म्हणाले.
तसेच मा.प्रदीप शेंडगे साहेब म्हणाले की ज्या ज्या वेळेस उठाव झाले तेव्हा इतिहासात पाहिले असता.. सर्वात पुढे आदिवासी बांधव होते.इंग्रजांना सळो की पळो करणारा आदिवासी समाजाने क्रांतीची पहिली मशाल आदिवासी बांधवांनी केली.एकलव्याला त्याग करून शिकावे लागले.तसेच आदिवासी बांधवांसाठी एकलव्य योजना,बिरसा मुंडा कृषी स्वावलंबी योजना,ठक्कर बाप्पा योजना,घरकुल योजनासाठी प्रशासनामार्फत आपल्या सोबत राहून काम करेल असे आश्वासन दिले.
यावेळी मा.प्रा.विक्रम कांबळे ॲड.दत्ता चव्हाण,उमा (ताई) जाधव,विजय साळवे,फारुख बेग यांनी मनोगत व्यक्त केले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.संतोष चव्हाण(सर) यांनी केले.आभार नंदकुमार गाडे सर यांनी मानले. अशी माहिती संविधान प्रचारक तुकाराम पवार यांनी दिली.
यावेळी सचिन भिंगारदिवे, सोमनाथ भैलुमे, ॲड.भगीरथ चव्हाण, ॲड.लोंढे, तुकाराम पवार, सोमनाथ गोरे, डिसेना पवार,राहुल पवार,पप्पू भोसले,पै. विजय साळवे,पै. संतोष आखाडे, लखन पारसे, संदीप अडसूळ, कायदेशीर पवार, करण ओहळ, उत्तम फुलमाळी, नाना कटारे, सुरज कदम, अंकुश गायकवाड, भाऊसाहेब जावळे, सर्वेनाथ काळे, मुकेश चव्हाण, श्रीकांत भोसले, रंगिशा काळे,राजु काळे, फरीदा शेख,शुभांगी गोहेर, काजोरी पवार, अर्चना भैलुमे,शितल काळे, सुनिता काळे, आशाबाई काळे, विजया काळे, तेजल काळे व दिपाली काळे, उपस्थित होते.