दादा पाटील महाविद्यालयात ‘विद्यार्थी आणि शिक्षक’ साहित्य संमेलन संपन्न.

कर्जत (प्रतिनिधी) :- रयत शिक्षण संस्थेचे, दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथील मराठी विभाग व राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद, पुणे यांच्यावतीने दादा पाटील महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवानिमित्त ‘विद्यार्थी आणि शिक्षक साहित्य संमेलन’ दादा पाटील महाविद्यालयाच्या ‘शारदाबाई पवार सभागृह’ येथे संपन्न झाले.
या संमेलनामध्ये कर्जत जामखेडचे आमदार रोहितदादा पवार यांना ‘राष्ट्रीय बंधुता पुरस्कार’ व प्रा. प्रदीप कदम यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
या संमेलनाची सुरुवात ‘आम्ही भारतीय अस्मिता दर्शन’ यात्रेने झाली. संपूर्ण कर्जत शहरामध्ये ही ग्रंथदिंडी मान्यवर साहित्यिक, शिक्षक व विद्यार्थ्यांसमवेत काढण्यात आली.
या संमेलनाचे स्वागताध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके यांनी स्वागतपर भाषण केले. अनेकविध साहित्याचे वाचन केले तरच जीवन समृद्ध होईल. वाचन केले तरच वाचाल अशी परिस्थिती आज बनलेली आहे. साहित्य नेहमी माणूसपण घडवण्याचे काम करत असते. तरुण पिढीने वाचनाची आवड जोपसण्याचे आवाहन केले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकांत वानखेडे व बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांची मनोगते झाली.
संमेलनाचे उद्घाटक प्रा. शंकर आथरे यांनी साहित्य संमेलन समजून घेण्यासाठी विद्यार्थी हा शिक्षक परायण असावा आणि शिक्षक सुद्धा विद्यार्थी परायण असावा म्हणजे ज्ञानाप्रती निष्ठा राहते असे सांगितले. माणूसपणाचे संस्कार घडविण्याचे काम अशा संमेलनातून होत असते.
संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी . आईकडून मिळालेल्या संस्कारमय साहित्यनिगडित आठवण सांगितली. पाठ्यपुस्तकातील साहित्य हे माणूसपण घडवणारे असते. साहित्यामध्ये अनेक मानवी मुल्ये दडलेली आहेत .साने गुरुजींच्या ‘दुःख पर्वताएवढे व एक होता कार्व्हर या पुस्तकांनी माझे जीवन समृद्ध केल्याचे सांगितले. साहित्य जीवनाचे परिवर्तन घडवत असते. साहित्यातूनच मन व मस्तक समृद्ध होत असल्याचे सांगितले.
संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात कवयित्री संगीता झिंजूरके यांच्या अध्यक्षतेखाली ‘काव्यपंढरी’ हा काव्य संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कवी संमेलनामध्ये गुलाबराजा फुलमाळी (नेवासा), डॉ. सुशील सातपुते (लातूर), रवींद्र यशवंतराव (मुरबाड), सुनिता कपाळे (छ. संभाजीनगर), पंडित निंबाळकर (कोपरगाव), विद्या जाधव (अहमदनगर), वीणा व्होरा (पंढरपूर), विजय माळी (धुळे), दीपक नागरे (वाशिम), सीमाराणी बागुल (नाशिक), उज्वला जाधव (कर्जत), स्वाती पाटील (कर्जत) या कवींनी सहभाग घेतला
या संमेलनामध्ये सचिन शिंदे (उमरखेड), डॉ. जतीनबोस काजळे (जामखेड), संतोष शेळके (नेरळ), मारुतराव वाघमोडे (रेहेकुरी), विजयकुमार पांचाळ (नांदेड), नारायण सोनावणे (कोपरगाव), रोहिदास शिखरे. (छ. संभाजीनगर), संदीप राठोड (निघोज), सचिन चव्हाण (पाथर्डी), हनुमंत घाडगे (बीड), राजू भाऊसाहेब पाडेकर (अहमदनगर) यांना राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेकडून ‘बंधुता काव्यप्रतिभा पुरस्कार’ देण्यात आला.
ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण आणि समारोप समारंभाचे सत्र संपन्न झाले. यावेळी प्रज्ञावंत पुरस्कार विजेते प्रा. प्रदीप कदम यांनी सांगितले की, मला मिळालेल्या या पुरस्कारामुळे माझी थोडी उंची वाढणार आहे. अशा पुरस्कारांमुळेच माणसे मोठे होतात आणि कामाची गती वाढते.
राष्ट्रीय बंधुता पुरस्कारप्राप्त आमदार रोहितदादा पवार यांनी ‘मला मिळालेला पुरस्कार मी सार्थकी लावेल’ असे आश्वासन दिले. जात-पात, धर्म याच्या पलीकडे हे राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद मानवतेच्या दृष्टीने काम करत असल्याचे सांगितले. संमेलन आहे साहित्यातून समानता, मानवता, बंधुता ही मूल्ये शिकता येतात. भेदभाव हा कोणत्याही धर्मात शिकविला जात नाही. मी देखील भेदाभेदाचे राजकारण बाजूला ठेवून विकासाचे राजकारण करत असल्याचे सांगितले. महापुरुषांनी जे विचार पेरले आहेत ते अंगिकारून आपण सर्वांनी त्यांचे कार्य पुढे घेऊन गेले पाहिजे असे सांगितले.
डॉ. श्रीपाल सबनीस यांनी माणसातील पशु अजून जागा असल्याचे मणिपूरच्या घटनेवरून सांगितले. भेदाचे राजकारण करणे सोपे असते, मात्र विकासाचे राजकारण अवघड असते. शिवरायांनी जनतेकरिता हिंदवी स्वराज्य स्थापन केले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण केले. साने गुरुजी हे शिक्षकांपुढील आदर्श आहेत. विश्वात्मक पातळीवर बंधुतेची भावना रुजावी, राजकारण विधायक करणे, संस्कृती शुद्धीकरण करणे हेच साहित्य संमेलनाचे उद्दिष्ट असल्याचे नमूद केले.
पुरस्कार वितरण समारंभामध्ये साहित्य, कला व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या डॉ. प्रमोद परदेशी, प्रा. सुखदेव कोल्हे, डॉ. संतोष घंगाळे, प्रा. स्वप्नील मस्के, प्रा. मीना खेतमाळीस, प्रा. राजेश दळवी, प्रा. प्रकाश धांडे, प्रा. भास्कर मोरे, प्रा. विक्रम कांबळे, मजहर सय्यद, सुरेश सखाराम गवारी, उल्का बाळासाहेब केदारे, सुनील प्रकाश भोसले या शिक्षकांना ‘राष्ट्रीय बंधुता गुणवंत शिक्षक पुरस्कार’ देण्यात आला. तसेच वैष्णवी गणपत गदादे, आदित्य गंगाधर कापसे, साक्षी शशिकांत वाघ, अमृता सुभाष वाघमारे, वेदिका प्रशांत गोंदकर, रोहिणी संजय भुते, नुपूर केदार लहाडे, प्रियांका हरिदास दराडे, अमृता अशोक पवार, तेजश्री दत्तात्रय दिंडे, ऋतुजा बाळासाहेब शेटे, प्रसाद बबन काळे, ऋषिकेश अरुण पवार, गणेश दत्तात्रय पवार, प्रियांका बाळासाहेब सस्ते, ज्ञानेश्वर राजेंद्र चांगण, अमृता भाऊसाहेब अडसूळ, प्रियंका सुभाष वाघमारे, प्रकाश दत्तू शिंदे, श्रीमंत भानुदास दळवी या २९ विद्यार्थ्यांना ‘राष्ट्रीय बंधुता गुणवंत विद्यार्थी पुरस्कार’ संमेलनात देण्यात आले.
दैनिक सकाळचे संपादक प्रकाश पाटील, डॉ. बंडोपंत कांबळे, सौ. मंदाकिनी रोकडे, सौ. निर्मला आथरे, नामदेवबापू राऊत, बाळासाहेब साळुंके, संतोष आप्पा म्हेत्रे, सुभाषचंद्र तनपुरे, सुनील शेलार, प्रसाद ढोकरीकर, तात्यासाहेब ढेरे, लालासाहेब शेळके, भाऊसाहेब तोरडमल, पत्रकार निलेश दिवटे, गणेश देवरे आदि मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. तसेच कर्जत परिसरातील साहित्यप्रेमी, कर्जत ग्रामस्थ व महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दहावे विद्यार्थी आणि शिक्षक साहित्य संमेलन यशस्वी करण्यामध्ये स्वागताध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके, संमेलनाध्यक्ष व दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे, व संमेलनाचे निमंत्रक प्रा. प्रशांत रोकडे व प्रा. सुखदेव कोल्हे यांनी विशेष परिश्रम घेतले