मा. अंबादासजी पिसाळ यांच्या वाढदिवसानिमित्त जि.प. प्रा शाळेंच्या मुलांना वह्यांचे वाटप.

राशीन (प्रतिनिधी )जावेद काझी. :- अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक माननीय अंबादास पिसाळ यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त राशीन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व मुला मुलींना मोफत वह्यांचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ. राजकुमार आंधळकर, संजय ढगे, मुख्याध्यापक सुद्रिक, व इतर मान्यवरांनी पिसाळ यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या .
यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शालेय कमिटी अध्यक्ष अतुल साळवे, भाजपा मुस्लिम अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष शोएब काझी, साहिल काझी, दत्ता गोसावी, भाजपा तालुका उपाध्यक्ष पांडुरंग भंडारे, राशीन शहराध्यक्ष एकनाथ धोंडे, मुख्याध्यापक वावगे सर, विखेंचे समन्वयक अमोल शेटे, एन. एस. पाटील, शक्ती मासाळ, सचिन साळवे, व इतर मुले ,मुली, शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी वृंद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय सोनवणे यांनी केले तर प्रस्ताविक व आभार सुद्रिक सर यांनी मानले.