त्या गंभीर जखमी हरणीवर शेवट पर्यंत प्रयत्न केले पण यश मिळाले नाही – मिलिंद राऊत.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी :- घटना आहे तीस तारखेची बालाजी फर्निचर मॉलच्या उद्घाटन कार्यक्रमास रात्री उशिरा गेलो होतो. त्याठिकाणी असतानाच आमचे मित्र वैभव उकिरडे यांनी फोन करून सांगितले की मॉलच्या जवळच एक अपघात झाला आहे लवकर या. त्याठिकाणी एका दुचाकीस्वार व हरिण यांच्यात मोठा अपघात झाला होता. तातडीने वन विभागाचे आरएफओ शेळके साहेब यांच्याशी संपर्क केला, सोबत राशीन येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ प्रेरणा सावळे यांना तपासणीसाठी बोलावले. घटना रोडवर असल्याने रस्त्यावर पाहणाऱ्यांची गर्दी होऊ लागली त्यामुळे डॉ सावळे, वन अधिकारी शेळके साहेब यांनी त्या हरिणास आपल्या यशोदानंद गोशाळेत घेऊन जाण्याचे सुचविले लगेचच आपत्कालीन वैद्यकीय सेवा तत्काळ देणारे ॲम्बुलन्स चालक शेखर जाधव यांना बोलवून त्या हरिणास त्वरित गोशाळेत घेऊन आलो.
दुसऱ्या दिवशी तातडीने सुट्टीचा दिवस असूनही तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.राम अनबुले, डॉ. काकडे, डॉ. राऊत यांनी हरिणाची तपासणी केली.सोबत वन विभागाचे कर्मचारी श्री पवार व भोसले यांनी हरिणाची पाहणी केली. वन विभागाच्या कार्यालया इतकेच हे हरीण आपल्या गोशाळेत सुखरूप असुन त्याची देखभाल व्यवस्थित सुरू असल्याची खातरजमा केल्याने हरिणास आपल्या गोशाळेतच ठेवण्यात आले.
त्या हरिणाच्या पोटाच्या बाजूला जोरदार मार लागल्याने त्याच्या मणक्याला दुखापत झाली होती.डांबरीवर आपटल्याने त्याच्या डोळ्यास जखम झाली होती.विशेष बाब म्हणजे ते हरीण प्रेग्नेंट होते. त्यामुळे त्यावर जास्त उपचार करता येऊ शकत नव्हते. त्यासाठी आयुर्वेदिक पद्धतीने काही उपचार करता येऊ शकतात का या उद्देशातून नांदेड येथील आयुर्वेदाचार्य श्री विष्णूजी भोसले यांच्याशी संपर्क साधला त्यांच्याकडून सर्व विधी माहिती करून घेऊन त्यानुसार उपचार देखील केले.
राशीन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ प्रेरणा सावळे या बाहेर गावी होत्या त्या आल्यानंतर त्यांनी देखील तातडीने हरिणाची प्रकृती जाणून घेण्यासाठी भेट दिली.मात्र तिच्या पोटातील बाळ राहिले नाही अशी माहिती त्यांनी दिली त्यामुळे तिला जास्त त्रास होत आहे असे सांगितले.
येसवडी येथील बिरा मामा हे बकरी, शेळी, मेंढी आदी प्राण्यांची नैसर्गिक पद्धतीने डिलिव्हरी करतात, त्यांना घेऊन आलो हरीण दाखवले मात्र तिचे दिवस आणखी पुढे आहेत तिला बाळ होण्यासाठी आणखी 2 महिने बाकी आहेत त्यामुळे आपण काही करू शकत नाही असे त्यांनी सांगितले.
आपल्या परीने अनेक केले मात्र तिची आज प्राणज्योत मावळली. चार दिवस गोशाळेत राहिली परंतु सर्वांना आपुलकी लावून गेली.त्यामुळे आपण एवढे प्रयत्न करूनही ते वाचू शकेल नाही याची मनाला हुरहूर लागून गेली.
वन विभागाचे फॉरेस्ट ऑफिसर शेळके साहेब यांनी स्वतः येऊन गोशाळेची पाहणी केली.आपल्या परिसरात हरिणाचे वास्तव्य मोठया प्रमाणात असल्याने नागरिकांनी गाडी चालवताना सर्वत्र पहावे,ज्या प्रकारे रस्ता क्रॉस करणाऱ्या माणसांची काळजी घेतो तशाच प्रकारे रस्ता क्रॉस करणाऱ्या प्राणाची देखील काळजी घ्यावी, अन्यथा निदर्शनात आल्यानंतर त्यावर गुन्हा दाखल केला जाईल असे त्यांनी आवाहन केले. डॉ सावळे यांनी डेट सर्टिफिकेट दिल्यानंतर वन विभागाचा हद्दीत त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.