ब्रेकिंग
कर्जतमध्ये आयशर टेम्पो पुलावरून कोसळला

Samrudhakarjat
4
0
1
8
7
9
कर्जत (प्रतिनिधी) :- राशीन महामार्गावर बेनवडी फाट्याजवळ आज रविवारी रात्री भीषण अपघात झाला आहे. आयशर टेम्पो पुलावरून खाली कोसळून हा अपघात झाला आहे. यामध्ये टेम्पोचा चालक गंभीर जखमी झालेला आहे. चालक हा पूर्ण दारूच्या नशेत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळत आहे.
पुलाचे कठडे तोडून ही गाडी खाली कोसळली आहे. मोठा आवाज होताच परिसरातील ग्रामस्थ मदतीसाठी धावून गेले. गाडीत इतर कोणतेही प्रवाशी नसल्याने अनर्थ टळला आहे. कर्जत येथील मेहराज पठाण यांच्या रुग्णवाहिकेतून चालकाला कर्जत येथे उपचारासाठी हलविण्यात आले. गाडी ही पैठण तालुक्यातील असून चालकाचे नाव आयुब शेख असे असल्याची माहिती मिळत आहे. चालक बेशुद्ध अवस्थेत आहे.