राशीन ग्रामपंचायती च्या लेखी आश्वासनानंतर मुस्लिम समाजाचे उपोषण मागे.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी :- राशीन येथील ईदगाह मैदान पवित्र स्थळातून अनधिकृतपणे काढलेली दूषित दुर्गंधीयुक्त गटारीचे पाणी बारामती अमरापूर रस्त्याच्या नवीन झालेल्या ड्रेनेज लाईन मध्ये सोडावे या मागणीसाठी राशिन व परिसरातील मुस्लिम समाजाच्या वतीने उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत येथे सोमवार दिनांक 13.3.2023 रोजी सकाळी 11.वाजता आमरण उपोषणास शोएब काझी, जावेद काझी, जमीर काझी, राजूभाई शेख जब्बार बागवान इकबाल शेख , अफजल तांबोली, वसीम तांबोळी ,अशरफ तांबोळी,
रियाज भाई भाेले ,शकील भाई शेख , मोहम्मद भाई काझी, साहिल शेख , व इतर मुस्लिम बांधव उपोषणास मोठ्या संख्येने बसले होते. यावेळी ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहाद-उल- मुस्लिमीन, रजाक भाई झारेकरी जिल्हाध्यक्ष अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक, वंचित बहुजन आघाडी, जनसेवा फाउंडेशन जेष्ठ नागरिक सेवा संघ कर्जत, या पक्ष व संघटनांनी, या उपोषणास पत्र देऊन पाठिंबा दर्शविला,
रात्री ९ वा. सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता वाकचौरे साहेब, गटविकास अधिकारी रूपचंद जगताप साहेब, राशिन च्या सरपंच नीलम साळवे, ग्रामविकास अधिकारी गुरव व ग्राम विकास अधिकारी विजयकुमार बनाते अल्लाउद्दीन काझी यांच्या उपस्थितीत राशीन ईदगाह मैदान जागेतील गटारीच्या पाण्याबाबत सकारात्मक लेखी पत्र व तोंडी आश्वासन सर्व उपस्थित अधिकाऱ्यांनी व मान्यवरांनी दिल्यामुळे मुस्लिम समाजाचे हे उपोषण मागे घेण्यात आले.