कर्जत तालुका बहुजन समाज पार्टीच्या तालुकाध्यक्ष पदी तालुक्यातील दुरगाव येथील अल्ताफभाई शेख यांची फेर निवड

राशीन( प्रतिनिधी) जावेद काझी :- कर्जत तालुका बहुजन समाज पार्टीच्या तालुकाध्यक्ष पदी तालुक्यातील दुरगाव येथील अल्ताफभाई शेख यांची फेर निवड करण्यात आलीअसून .बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सु.श्री.बहन कु.मायावतीजी यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.संदीपजी ताजणे साहेब यांच्या मान्यतेनुसार त्यांची अध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की , राष्ट्रीय अध्यक्षा सु.श्री. बहन. कु. मायावतीजी यांच्या नेतृत्वाखाली महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहुजी महाराज आणि विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची समतावादी विचारधारा संपूर्ण भारतभर रूजविण्याच्या महान कार्यात सहभाग मिळावा. या अनुषंगाने आपली नेमणुक करण्यात येत आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये
निष्ठेने, धैर्याने व आंतरिक तळमळीने बहुजन समाज पार्टीच्या विचारधारेचा प्रचार व प्रसार कराल अशी अपेक्षा . यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष अल्ताफभाई शेख म्हणाले , राष्ट्रीय अध्यक्षा सु. श्री. बहन कु. मायावतीजी यांच्या व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. संदीप ताजने साहेब यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळात बहुजन समाज पक्षाचा विस्तार करणार असून पार्टीची विचारधारा प्रचार व प्रसार करणार आहे.निवडीबद्दल अल्ताफभाई शेख यांचे ठिकठिकाणी अभिनंदन करण्यात येत आहे.